भाऊ-भाऊ मिळुन धुरळा उडवू, क्रिकेटच्या मैदानात 5 जोड्यांची चर्चा

भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमधून कृणाल आणि हार्दिक पांड्या दोन्ही भाऊ एकाच मैदानात टीम इंडियाकडून खेळताना दिसले. पण हे पहिल्यांदाच घडलंय असं नाही. क्रिकेट विश्वात दोन भाऊ एकत्र खेळल्याची याआधीचीही काही उदाहरणं आहेत. कृणाल हार्दिकच नाही तर भावांच्या या जोड्यांही मैदानात दाखवली कमाल. जाणून घेऊया त्याविषयी  

Mar 26, 2021, 11:45 AM IST
1/5

हार्दिक आणि कृणाल पांड्या

हार्दिक आणि कृणाल पांड्या

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक आणि कृणाल पांड्या एकत्र मैदानात उतरले. या सामन्यात कृणालने पदार्पण केले. यापूर्वी कृणाल आणि हार्दिक बडोद्याकडून खेळले आहेत. तर हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.

2/5

मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ

मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ

त्याच प्रमाणे मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ दोघांनी मिळून 3 वन डे सामने भारतासाठी एकत्र खेळले आहेत. मोहिंदर यांनी 20 वर्ष भारतीय संघासोबत क्रिकेटचे सामने खेळले. तर सुरिंदर यांनी केवळ 13 सामने खेळले.   

3/5

इरफान आणि यूसुफ पठान

इरफान आणि यूसुफ पठान

अमरनाथ बंधूंनंतर यूसुफ पठाण आणि इरफान पठान यांची जोडी खूप गाजली. या दोघांनीही भारतासाठी वन डे सामने खेळले.  दोघांनी मिळून भारतीय संघासाठी 8 वन डे सामने खेळले. 2003मध्ये इरफाननं आपल्या डेब्यू केला तर 2008मध्ये यूसुफला टीम इंडियात समाविष्ट करण्यात आलं होतं. 

4/5

मार्क आणि स्टीव वॉ

मार्क आणि स्टीव वॉ

ऑस्ट्रेलियाकडून मार्क आणि स्टीव्ह वॉ एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय सामने खेळले. स्टीव्ह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना मार्कनेही आपली दमदार कामगिरी केली. इतकेच नव्हे तर स्टीव्हच्या नेतृत्वात 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला तेव्हा मार्कही संघात होता.

5/5

टॉम आणि सॅम कुरेन

टॉम आणि सॅम कुरेन

टॉम आणि सॅम कुर्रेनची जोडी इंग्लंडकडून एकत्र खेळते. हे दोन्ही भाऊ सध्या भारता विरुद्धच्या मालिकेतही खेळत आहेत. टॉमने 2017 मध्ये पदार्पण केले. तर सॅम प्रथम इंग्लंडकडून 2018 मध्ये खेळला होता.