budget 2021: PM किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणार इतके रुपये

पीएम किसान सन्मान निधी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.47 कोटी शेतकऱ्यांना लाभ या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Jan 22, 2021, 19:35 PM IST
1/4

डिसेंबर 2018 पासून या योजनेची सुुरुवात

डिसेंबर 2018 पासून या योजनेची सुुरुवात

 यावेळी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. PM किसान योजनेतील वार्षिक रक्कम वाढवण्याची शक्यता आहे.या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, डिसेंबर-मार्च या तीन टप्प्यात पैसे जमा केले जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.47 कोटी शेतकऱ्यांना लाभ या योजनेचा लाभ मिळाला आहे.

2/4

500 रुपये महिना तुटपूंजी मदत

500 रुपये महिना तुटपूंजी मदत

केंद्र सरकारकडून मिळणारा निधी हा तुटपूंज असल्याचं शेतकऱ्य़ांनी सांगितलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी हा निधी वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 2021-22 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण याबाबत मोठी घोषणा करू शकतात. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

3/4

6 हजारवरून 10 हजारवर होण्याची शक्यता

6 हजारवरून 10 हजारवर होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते PM किसान योजनेत शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये तीन टप्प्यानं मिळणार होते. ही 6000 रुपये रक्कम मिळणार होती. ती आता 10 हजार रुपये केली जाऊ शकते.

4/4

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

1. कोरोनानंतर आता बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या बजेटमध्ये PM किसान निधीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.