Budget 2023 : मोदी सरकारने बजेटमधील बंद केलेल्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Budget 2023 : ब्रिटीशांनी सुरु केलेल्या परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारने अर्थसंकल्पातही याचा अवलंब केला आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. या वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातही काही बदल होण्याच्या शक्यता आहे

Jan 23, 2023, 19:19 PM IST
1/7

pm modi, nirmala sitharaman

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रत्येक वेळी सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. मात्र मोदी सरकारने त्यांच्या काळात अर्थसंकल्पाशी संबंधात केलेल्या बदलांविषयी तुम्हाला माहिती आहे का? 

2/7

budget date, union budget 2023

देशात ब्रिटिश काळापासून दरवर्षी 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र मोदी सरकारने 2017 पासून तो 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय घेतला. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदा 1 फेब्रुवारी 2017 रोजी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला होता.

3/7

railway budget,budget 2023

मोदी सरकारने ब्रिटिश काळातील परंपरा बदल्याण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम अर्थसंकल्पावरही दिसून आला. ब्रिटिश काळापासून ते 2016 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प वेगवेगळा मांडला जात होता. मात्र 2016 पासून ही परंपरा बंद करण्यात आली. 2016 पासून रेल्वे अर्थसंकल्प देखील केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग बनला आणि एकत्ररित्या सादर केला जावू लागला.

4/7

budget tab, union budget 2023

1947 मध्ये अर्थमंत्री आरसीकेएस चेट्टी हे लेदरच्या बॅगमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन संसदेत येत असत. पण 5 जुलै 2019 रोजी अर्थमंत्री लाल कापडाच्या बॅगेमध्ये बजेटशी संबंधित कागदपत्रे घेऊन संसदेत पोहोचल्या होता. 2021 मध्ये यात आणखी बदल करण्यात आला कागदपत्रांची जागा टॅबलेटने घेतली.

5/7

niti aayog, budget 2023

2015 मध्ये मोदी सरकारने नियोजन आयोग रद्द करण्यात आला आणि नीती आयोगाची स्थापना केली. या बदलामुळे देशातील पंचवार्षिक योजनाही संपुष्टात आल्या.

6/7

Halwa Ceremony,  budget 2023

कोविडमुळे 2022 च्या अर्थसंकल्पात आणखी एक बदल करण्यात आला होता. अर्थसंकल्पाच्या छपाईपूर्वी होणारी Halwa Ceremony देखील बंद करण्यात आली आहे.

7/7

new parliament building, budget

2023 च्या अर्थसंकल्पातही मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवीन संसद भवनात अर्थसंकल्प सादर करू शकतात.