बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? देवेंद्र फडणवीस यांनी यादीच वाचून दाखवली

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही.. तर आंध्र प्रदेश आणि बिहारला केंद्र सरकारनं खैरात वाटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? पाहुया

| Jul 23, 2024, 21:29 PM IST

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला.. या अर्थसंकल्पाकडे देशातील सर्व घटकांचं लक्ष लागलं होतं.. तर राज्याला काय मिळणार याचीही उत्सुकता लागली होती...मात्र या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही मिळालं नसल्याचं पाहायला मिळतंय.. दुसरीकडे बिहार आणि आंध्र प्रदेशवर पैशांचा पाऊस पाडलाय..दरम्यान विरोधी पक्षांनी बजेट न वाचताच टीका केल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसानी केलाय.

1/12

 मुळा मुठा नदी संवर्धन - 690 कोटी

2/12

पुणे मेट्रो -  814 कोटी

3/12

नाग नदी पुनरुज्जीवन - 500 कोटी  

4/12

नागपूर मेट्रो -  683 कोटी

5/12

मुंबई मेट्रो -  1087 कोटी

6/12

MUTP- 3  908 कोटी

7/12

महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प - 150 कोटी

8/12

पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प - 598 कोटी  

9/12

विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प -  600 कोटी

10/12

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर  - 499 कोटी

11/12

सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर -  466 कोटी

12/12

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार  - 400 कोटी