स्वस्तात कार घ्यायचीय, मग ही बातमी तुमच्यासाठी, या कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Jun 14, 2021, 21:11 PM IST

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचा थेट  परिणाम कार विक्रीवरही पाहिला मिळतोय. आता काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर व्यवसायांबरोबरच कार शोरुमही सुरु करण्यात आले आहेत. मारुती सुझूकी कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कारवर बंपर डिस्काऊंट जाहीर केला आहे. यात एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंट अशा आकर्षक ऑफरचा समावेश आहे. ही ऑफर 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मारुती सुझूकीच्या कोणत्या कारवर डिस्काऊंट मिळतोय.

1/5

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio

मारुति सुजुकीने आपल्या  Celerio कारच्या खरेजीवर  21 हजार रुपयांपर्यंत सूट दिली आहे. माहितीनुसार Celerio कारवर केवळ 15 हजार रुपये एक्सचेंज ऑफर आहे. याशिवाय 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 3 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त ऑफरचाही समावेश आहे

2/5

Maruti Suzuki Wagon-R

Maruti Suzuki Wagon-R

मारुती सुझूकीची सर्वात लोकफ्रिय कार म्हणजे Maruti Wagon-R. या महिन्यात तुम्ही Maruti Wagon-R घेण्यााच  विचार करत असाल तर तुम्हाला 29 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. Maruti Wagon-R पेट्रोल मॉडेलवर 8 हजार रुपयांपर्यंतची सूट, तर 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 3 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त ऑफरचाही समावेश आहे. Maruti Wagon-R मध्ये 1.0 लीटर  आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिनाचा पर्याय उपलब्ध आहे.  Maruti Wagon-R सीएनजी मॉडेलवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट मिळतेय. Maruti Wagon-R ची शोरुम किंमत 4.80 लाख ते  6.33 लाख रुपयांपर्यंत आहे.

3/5

Maruti Suzuki Eeco

Maruti Suzuki Eeco

मारुती सुझूकीच्या 7 सीटर असलेल्या Eeco कारच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेलवर तब्बल 31 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.  Maruti Suzuki Eecoच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट, 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय इतर आकर्षक ऑफरही आहेत.  कारची किंमत 4.08 ते 5.29 लाख रुपयांपर्यंत आहे.

4/5

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki S-Presso

मारुति कंपनी 'माइक्रो-एसयूवी' S-Presso कारवरही शानदार ऑफर देत आहे.  Maruti S-Presso कार खरेदीवर 20 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट असून जुन्या कारच्या बदल्यात आणखी 15 हजारांची सूट देण्यात आली आहे. याशिवाय कॉर्पोरेट डिस्काऊंटचाही समावेश आहे. S-Presso पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही मॉडेलवर ही ऑफर लागू आहे.  S-Presso कारमध्ये  1.0 लीटर पेट्रोल इंजीन आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे. S-Presso कारचा 21.7 प्रतिलीटर अॅव्हरेज आहे.  Maruti S-Presso ची  शोरूम किंमत 3.78 लाख रुपयांपासून  5.26 लाख रुपयांपर्यंत आहे.

5/5

Maruti Suzuki Alto 800

Maruti Suzuki Alto 800

मारुती सुझूकीची सर्वात स्वस्त कार म्हणजे ऑल्टो 800.  ऑल्टो कारवर 20 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला असून जुन्या कारच्या बदल्यात आणखी 15 हजारांची सूट देण्यात आली आहे. याशिवाय 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 3 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त ऑफरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सीएनजी कारसाठीही 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. ऑल्टो 800 कारमध्ये 796 ccचं पेट्रोल इंजिन आहे. याशिवाय सीट बेल्ट अलर्ट,  रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट अशा सुविधाही उपलब्ध आहेत. सेफ्टी फिचर्समध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन अशी वैशिष्ट्य आहेत.  मारुति ऑल्टोची एक्स-शोरूम कीमत 2.99 लाख रुपयांपासून  4.60 लाख रुपयांपर्यंत आहे.