महाराष्ट्रातील एकमेव बीच ज्याच्यासमोर अख्खा गोवा पण फिका पडेल; कोकणातील कशेळी बटरफ्लाई बीच

कशेळी देवघळी बीचवर एक रहस्यमयी गुहा देखील आहे. जाणून घेऊया हा समुद्र किनारा आहे कुठे? इथं जायचं कस?    

| May 24, 2024, 18:10 PM IST

Kasheli Beach Ratnagiri : गोव्यासारखे सुंदर समुद्र आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत. असाच एक सुंदर समुद्र किनारा रत्नागिरीत आहेत. कशेळी येथील देवघळी बीच समोर गोवा देखील फिका पडेल. 

1/7

महाराष्ट्रातही सेम टू सेम गोव्यातील एक समुद्र किनाऱ्यासारखा दिसणारा समुद्र किनारा आहे.

2/7

कशेळी गावातील कनकादित्याचे प्राचीन मंदिर हे प्रसिद्ध आणि कोकणातील सर्वात मोठे देवस्थान आहे. 

3/7

किनार्‍यावरील कड्यावर सुमारे 15 फूट उंचीवर, 40 चौ. फुटांची नैसर्गिक गुहा आहे. इथेच कनकादित्याची मूर्ती सापडली. 

4/7

या समुद्र किनाऱ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथम डोंगर उतरुन या समुद्र किनाऱ्यावर पोहचावे लागते. कारण हा समुद्र किनारा दोन डोंगरांच्या कपारीत आहे.  

5/7

कशेळी बीचचा आकार हा गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा  आहे. हा कोकणोतील अतिशय सुंदर समुद्र किनारा आ

6/7

कशेळी येथील देवघळी बीच वरील सनसेट पॉईंटला सध्या ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’म्हणून पहिली पसंती मिळत आहे. टेबल पॉईंटवरूनदेखील निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. 

7/7

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातला देवघळी बीच  हा गोव्याला टक्कर देतोय.