जे एन पी टी वाचवण्यासाठी मनसेचे फिल्मी पोस्टरच्या माध्यमातून कॅम्पेन

मुंबईचे बंदर हे मुंबईची आर्थिक राजधानी असण्याच्या कारणांमधले एक कारण

| Jul 21, 2020, 09:20 AM IST

मुंबई : मागच्या कित्येक वर्षापासून मनसे सांगत आली आहे की जे.एन.पी.टी हा केवळ मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव आहे. शेकडो वर्षापासून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून येणारी जहाजे मुंबई बंदरावरच माल उतरवतात. मुंबईचे बंदर हे मुंबईची आर्थिक राजधानी असण्याच्या कारणांमधले एक कारण. हे महत्व कमी करण्यासाठी दुसरे मोठे बंदर पर्याय म्हणून उभे करणे गरजेचे असल्याने गुजरातमधील बंदरे विकसित केली गेली. मग ती मुंद्रा असो की कांडला असो की हाझिरा पोर्ट असो. पण हा लगोलग तर मुंबई पोर्ट ट्रस्टवरचा ट्राफिक तिकडे वळता करता येणार नाही म्हणून मुंबई बंदर हे रहदारी, रस्ते, गोदामांच्या नसलेल्या सुविधा अशी कारणे देऊन नालायक ठरवले गेले. आणि मोठी जागा गरजेची म्हणून जे.एन.पी.टी चे घोडे पुढे दमटले. 

1/5

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

जे.एन.पी.टी वर ट्राफिक तर वळवला पण जे.एन.पी.टी व्यावसायिक दृष्ट्या प्रोफेशनल बंदर होणार नाही तिथे जागतिक स्तराच्या पायाभुत सुविधा तयार होणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली गेली. परिणामी जे.एन.पी.टी आज डंपिंग ग्राऊंडपेक्षा वेगळे नाही. 

2/5

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

आणि तेच कारण देत उत्तमोत्तम सुविधांची बतावणी करत जे.एन.पी.टी वर येणारी जहाजे अदानीने चालवायला घेतलेलेया मुंद्रा पोर्टवर हलवली जात आहेत. काल आलेली आणि सोबत जोडलेली बातमी हा त्याच टप्प्याचा भाग आहे.

3/5

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

 जे.एन.पी.टी छोट्या असणाऱ्या मुंद्रा पोर्टवरचा कंटेनर ट्राफिक जे.एन.पी.टी पेक्षा जास्त ठरला. आज जागतिक बंदरात मुंबई पोर्ट ट्रस्ट पहिल्या ५० मध्येही दिसणार नाही.पण मुंंद्रा दिसेल आज जे.एन.पी.टी आणि मुंद्राच्या जागतिक क्रमवारीत जास्त अंतर नसले . 

4/5

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

जे.एन.पी.टी पुढी असली तरी येत्या काळात जसं आता मुंद्राची कंटेनर ट्राफिक वाढली आहे तसचं जागतिक क्रमांकही वाढेल. थोडक्यात आज जागलो नाही तर भविष्यात जे.एन.पी.टी फक्त चित्रपटांच्या शुटिंगसाठी खंडर म्हणून वापरले जाईल. 

5/5

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

मुंबईचे सागरी वर्चस्व संपवण्याचा डाव

गुजरात सरकार गुजरातचेच भले इच्छिनार त्यात वावगे काही नाही पण महाराष्ट्र कधी पर्यंत झोपून राहणार? की झोपेतच मारले जाण्याची वाट पाहणार असा सवाल मनसे नाविक सेनेचे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी उपस्थित केला आहे...