महिला रूद्राक्ष धारण करू शकतात का?

हिंदू धर्मात रूद्राक्षाला शुभ स्थान दिले आहे. असं म्हटलं जात की हे धारण केल्याने आपल्यावर महादेवाची कृपा होते. पण तुम्हाला माहित आहे का सर्वचजण रूद्राक्ष धारण करू शकत नाही. मग रूद्राक्ष नक्की कोणी परिधान करावा ते जाणून घेऊयात. 

Aug 13, 2024, 12:53 PM IST
1/7

शिवपुराणात भगवान शिव आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा उल्लेख केला आहे. बेलपत्र आणि सर्प याशिवाय महादेवाला रूद्राक्षही खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, रूद्राक्ष हा भगवान शंकराच्या डोळ्यातून पडलेला अश्रू आहे आणि याचे सेवन केल्याने माणसाच्या सर्व समस्या दूर होतात. 

2/7

रूद्राक्ष हे एका झाडापासून तयार होते. याचे खोड कठीण असते ज्यावर पांढरी फुलं येतात.हे फळ सुरूवातीला हिरवे असते , पिकल्यावर निळे तर सुकल्यावर काळे होते. तयार झालेले हे काळे फळ म्हणजे रूद्राक्ष असते. 

3/7

रूद्राक्षावर एक ते चौदा पट्टे असतात. या पट्ट्यांच्या संख्यांच्या आधारे रूद्राक्षांना नाव दिले जाते. एक पट्ट्या असलेल्या रूद्रक्षाला एकमुखी तर दोन पट्टे असलेल्या रूद्राक्षाला डोमुखी आणि पाच पट्टे असलेल्या रूद्राक्षाला पंचमुखी असं म्हणतात.   

4/7

खूप कमी स्त्रिया रूद्राक्ष धारण करतात. केवळ साध्वी स्त्रियांद्वारेच रूद्राक्ष धारण केले जाते.शास्त्रानुसार महिला रूद्राक्ष धारण करू शकतात आणि रूद्राक्ष धापण करणं त्यांच्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. 

5/7

जर महिला  रूद्राक्ष धारण करत असतील तर त्याचे नियम समजून घेणे गरजेचे आहे त्याच बरोबर रूद्राक्षाच्या शुद्धतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळात रूद्राक्षाची माळ काढून ठेवावी आणि नंतर परिधान करताना पुन्हा शुद्ध करून धारण करावी. 

6/7

ज्योतिषशास्त्रानुसार महिलांसाठी एकमुखी, द्विमुखी आणि तीनमुखी रूद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं.जर ते हातात रूद्राक्ष धारण करायचा असेल तर तो डाव्या हातात धारण केल्याने स्त्रियांमधील ऊर्जेचे संतुलन राखण्यास मदत होते.

7/7

रूद्राक्ष धारण केल्यानंतर ते महादेवाला अर्पण करा आणि काही वेळ तिथेच राहूद्या.यानंतर ओम नम: शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करा आणि रूद्राक्ष धारण करा. पण हे लक्षात ठेवा की रूद्राक्ष धारण करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण काळ आणि राशीनुसार रूद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं.