क्रिकेटच्या मैदानात जस्टिन ट्रुडोंना दिल्या कपिल देव आणि अझरुद्दीननी खास ट्रीप्स

Feb 23, 2018, 19:56 PM IST
1/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

आज कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिल्लीतील एका शाळेला भेट देऊन क्रिकेटचा आनंदही लुटला. बॅटवर स्वाक्षरी करत ट्रुडो यांनी ग्लोबल टी 20 कॅनडाला शुभेच्छा दिल्या.   

2/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

जस्टीन ट्रुडो यांंच्या परिवाराने क्रिकेटच्या मैदानात हजेरी  लावल्यानंतर भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज मोहम्मद अजरूद्दीन आणि कपिल देव यांनी त्यांना खास टीप्स दिल्या. जस्टीनदेखील बॅट खास अंदाजात हवेत भिरवत क्रिकेटच्या मैदानात आले. 

3/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या भारत दौर्‍यामध्ये त्यांंच्यासोबत कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन देखील आले आहेत. ट्रुडोंसोबत त्यांंच्या मुलांनाही क्रिकेटचा मोह टाळता आला  नाही.  

4/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

जस्टिन ट्रुडोंंच्या मुलांना अझरूद्दीनने फलंदाजीचे तर कपिल देव यांनी गोलंदाजीचे धडे दिले. त्यानंतर दोघांनी काही शॉट्सदेखील खेळले.   

5/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

कॅनडाच्या टी20 लीगला ICC कडून मान्यता मिळाली. दिल्लीतील कार्यक्रमामध्ये याबाबतची घोषणा केली आहे. यंदा जुलै महिन्यापासून या खेळाला सुरूवात होणार आहे. 

6/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

कॅनडा क्रिकेट लीगमध्ये सहा टीम्स असतात. लीगमध्ये कॅनडाचे चार खेळाडू आणि इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. 

7/7

Canada PM Justin Trudeau

Canada PM Justin Trudeau

क्रिक्रेट लीगमुळे कॅनडामधील पर्यटनालाही चालना मिळेल अशी आशा कॅनडा क्रिकेटचे अध्यक्ष रणजीत सैनीने व्यक्त केली आहे.