EXCLUSIVE : श्रेया बुगडेची हॉटेल व्यवसायात उडी? पाहा कसं आहे तिचं The Big Fish & Co.

Exclusive : अभिनेत्री श्रेया बुगडेने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय. उद्योजिका उज्जवल सामंत आणि यतीन खानोलकर यांच्यासोबत तिने नवीन रेस्टॉरंट दादरमध्ये सुरु केलंय.  'दि बिग फिश अँड कंपनी' नाव असलेलं हे रेस्टॉरंट आतून कसं दिसतं, पाहा हे Exclusive Photos. 

| Jan 29, 2024, 16:57 PM IST

Shreya Bugde Hotel Exclusive Photos : अभिनेत्री श्रेया बुगडेने एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलंय. श्रेया आता हॉटेल व्यावसायिक झाली आहे. श्रेया बुगडेने हा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरु केला असून तिचे पार्टनर आहेत उद्योजिका उज्ज्वल सामंत आणि यतीन खानोलकर. 26 जानेवारी 2024 रोजी श्रेया आणि तिच्या भागीदारांनी दादरमध्ये शिवसेना भवन मार्ग इथे त्यांचं सीफूड स्पेशल 'दि बिग फिश अँड कंपनी' या रेस्टॉरंटच उद्घाटन केलंय. पाहूया हे रेस्टॉरंट आतून कसं दिसतं आणि तिथे तुम्हाला कोणते सीफूड खाता येणार आहेत. पाहा याचे Exclusive Photos. 

1/12

श्रेया बुगडेचे भागिदार

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

श्रेया बुगडे आणि तिचे भागिदार उद्योजिका उज्ज्वल सामंत आणि यतीन खानोलकर. 

2/12

श्रेयाच्या रेस्टॉरंटचं नाव

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

'दि बिग फिश अँड कंपनी' असं श्रेयाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. 

3/12

कसा आहे लूक?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

गोवा हे या तिघांचंही आवडीचं ठिकाण आहे. पण परदेशातील काही युरोपियन घरं जशी असतात, तसा लूक आतून हॉटेलला दिला आहे. हे फाइन-डाइन असलं तरी, सर्वसामान्यांना इथे येऊन जेवता येईल असं आहे. 

4/12

असा आहे अँम्बियन्स?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

गोव्यातील गाणी, लखलखीत उजेड, छान अँम्बियन्ससह या रेस्टॉरंटमध्ये माशांचा आनंद घेता येईल. घरात जेवतो तसं बाहेर जाऊन जेवायची इच्छा आहे त्या लोकांसाठी हे हॉटेल आहे. कुटुंबियांसोबत येण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

5/12

पॉझिटिव्ह Vibes

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

अतिशय सकारात्मक Vibes तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये आल्यावर मिळणार आहेत. 

6/12

कोण आहेत पार्टनर?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

श्रेया बुगडेच्या भागिदार उज्ज्वल सामंत या स्वतः यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांना व्यवसाय आणि त्याच्या मॅनेजमेंटचा चांगला अनुभव होता. याचा फायदा झाल्याचं श्रेया सांगते. 

7/12

व्हेज की नॉन व्हेज?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

श्रेया बुगडे आणि तिच्या पार्टनर्सनी कोस्टल फूड बनवणारे हॉटेल सुरु करावे, हा विचार एकत्र केला होता. 

8/12

पारंपरिक टच

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

The Big Fish ची मांडणीला मॉर्डन टच असला तरीही त्यातील अनेक गोष्टी या पारंपरिक आहेत. येथे डेकोरेशनसाठी जुन्या पारंपरिक भांड्यांचा वापर केलाय. 

9/12

कुठे आहे?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

उज्ज्वल सामंत आणि यतीन खानोलकर दोघंही हार्ड कोअर दादरकर आहेत. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा पत्ता दादर, मुंबई 28 असाच असावा हा त्यांचा निश्चय होता. 

10/12

काय मिळणार?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

सर्व प्रकारच्या थाळी - बोंबिल, सुरमई, खेकडा, पापलेट, कोलंबी, चुलीवरचं मटण, चिकन बिर्याणी, खिमा, मालवणी मसाल्यातले तंदुर बेबी कॉर्न, मशरुम, खदखदं, नारळाच्या रसातील टॉमेटोची भाजी असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे मासांहारी लोकांसह शाकाहारी खवय्यांसाठीही इथे पर्वणी आहे.  

11/12

व्हेजमध्ये काय?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

व्हेजमध्ये काही गोव्यातल्या, जीएसबी रेसिपी देखील आहेत. खदखदलं, नारळाच्या रसातील शिरवळ्या, अळू वडी, कोथिंबीर वडी, हळदीच्या पानातील पातोळ्या यांचा समावेश आहे.   

12/12

का सुरु केलं रेस्टॉरंट?

Actress Shreya Budge Started Her Own Hotel The Big Fish And Company

श्रेया बुगडे आणि तिचे भागिदारही स्वतः खव्वयै आहेत. मासे हा त्यांचा विक पॉईंट या अनुशंगानेच त्यांनी हे रेस्टॉरंट सुरु केलंय.