Chanakya Niti: पती-पत्नीने रोज या 4 गोष्टी केल्या पाहिजेत, कधीच येणार नाही नात्यात दुरावा

Pati Patni Chanakya Niti: नवरा आणि बायको यांच्या संबंध हे त्यांच्या नात्यावर अबलंबून असतात. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीने दररोज 4 गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांच्यात दुरावा येत नाही.

Dec 13, 2022, 14:08 PM IST
1/5

Chanakya Niti for Husband Wife: लग्न झाले की अनेक वेळा भांड्याला भांडे लागते आणि खटके उडू लागतात. मात्र, पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले राहावे यासाठी काही गोष्टी केल्या तर जिवनात गोडवा निर्माण होतो. वैवाहिक जीवन आणि पती-पत्नीचे नाते नेहमी एकमेकांच्या समन्वयावर अवलंबून असते आणि वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी सांगतात, पती-पत्नीमध्ये समन्वय नसताना परस्पर भांडणे होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. चाणक्याने आपल्या नितीमध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत.

2/5

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीत सांगितले की, पती-पत्नीने आपल्या खासगी गोष्टी कोणाशीही शेअर करू नयेत. चाणक्य नीतीनुसार जे लोक आपले शब्द स्वतःपुरते मर्यादित ठेवतात ते नेहमी आनंदी असतात, त्यामुळे पती-पत्नीनेही याची काळजी घ्यावी आणि वैयक्तिक गोष्टी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत. जर त्यांनी तिसर्‍या व्यक्तीशी आपले म्हणणे शेअर केले तर  पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

3/5

वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, पती-पत्नीने कधीही कोणत्याही गोष्टीवर एकमेकांचा अहंकार दाखवू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते, वैवाहिक जीवनात पती-पत्नी हे गाडीच्या दोन चाकांसारखे असतात आणि गाडी तेव्हाच चालते जेव्हा दोन्ही चाके सुसंगत असतात. म्हणजेच दोघांपैकी कोणाला घमंड असेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो.

4/5

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही नात्याच्या बळकटीसाठी एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे असते आणि पती-पत्नीचे नातेही तेव्हाच मजबूत होते जेव्हा दोघांमध्ये प्रेम आणि आदर असतो. म्हणूनच चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात कधीही दुरावा येत नाही.

5/5

चाणक्य नीतीनुसार, लोकांना जीवनात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते, परंतु जे सर्व परिस्थितीत संयमाने काम करतात त्यांचे जीवन यशस्वी होते. सुखी जीवन जगण्यासाठी पती-पत्नीने संयम ठेवावा, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही जीवन पुढे नेण्यात यश मिळते.     (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)