Chanakya Niti: घरात दिसणारे 'हे' 5 संकेत देतात आर्थिक संकटाचा इशारा; वेळीच सावध व्हा!

Chanakya Niti Money: यशस्वी जीवन जगण्यासाठी आचार्य चाणक्यने अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. यामध्ये खासगी आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींबद्दल चाणक्य यांनी माहिती दिली आहे. चाणक्य यांच्या सांगण्यानुसार घरामध्ये दारिद्र्य येणार असेल तर त्याचे काही संकेत मिळतात. या संकेतांची चाहूल लागल्यास वेळीच सावध झालेलं बरं. हे संकेत कोणते जाणून घेऊयात...

Mar 01, 2023, 17:59 PM IST
1/6

chanakya niti

चाणक्य यांना आर्थशास्त्र, राजकारण, सामाजिक आणि संस्कृतिक क्षेत्राचं चांगलं ज्ञान होतं. चाणक्य यांच्या नितींचं पालन करणाऱ्यांना कायमच यश लाभलं. आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार घरामध्ये दारिद्र्य येणार असेल तर त्याचे काही संकेत मिळतात. या संकेतांची चाहूल लागल्यास वेळीच सावध झालेलं बरं. हे 5 संकेत कोणते पाहूयात...

2/6

chanakya niti

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार कुटुंबामध्ये वाद झाल्याने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली राहत नाही. घरात सतत वाद होत असतील तर दारिद्र्य वाढू लागतं. ज्या घरात वारंवार वाद होतात अशा घरात कायमच पैशांची चणचण जाणवते.

3/6

chanakya niti

घरात कायम ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे. ज्या घरात वयस्कर लोकांचा सन्मान होत नाही किंवा वारंवार त्यांचा अपमान होतो अशा घरी लक्ष्मी नांदत नाही. अशा घरांवर लक्ष्मीची कृपावृष्टी राहत नाही.

4/6

chanakya niti

घरात तुळशीचं रोपटं सुकलं तर घरात आर्थिक संकट येणार असं समजावं. असं का होत आहे याच्या मुळाशी जावून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

5/6

chanakya niti

घरात वारंवार काचेच्या वस्तू तुटणं हे सुद्धा आर्थिक संकटाकडे इशारा करणाऱ्या संकेतांपैकी एक आहे. हिंदू धर्मामध्ये काच तुटणे हे अशुभ मानलं जातं. आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार ज्या घरांमध्ये वारंवार काचेच्या वस्तू तुटतात अशा घरांमध्ये दारिद्र्य येतं.

6/6

chanakya niti

घरात नियमितपणे पूजा करावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या घरात पूजा होत नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही. अशा घरांमध्ये कायम दारिद्र्य नांदतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)