चंद्रावरुन अशी दिसते पृथ्वी; चांद्रयान 3 ने पाठवले सुंदर फोटो

चांद्रयान 3 ने आधी चंद्राचे फोटो पाठवले होते. यानंतर आता चांद्रयान 3 ने पृथ्वीचे फोटो शेअर केले आहेत. 

Aug 10, 2023, 15:15 PM IST

Chandrayaan-3  : लवकरच भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राचे फोटो पाठवले होते. आता चांद्रयान 3 ने चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते याचे फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. चंद्रावरुन पृथ्वी अतिशय सुंदर दिसत आहे. चांद्रयान 3 च्या ऍडव्हान्स्ड कॅमेऱ्याने हे फोटो पाठवले आहे. 

1/6

चांद्रयान 3 पृथ्वीपासून बरेच दूर गेले असून आता ते चंद्राच्या कक्षेत आले आहे. चंंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते याचा झलक चांद्रयान 3 ने दाखवली आहे. 

2/6

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.  इस्रोसाठी विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. 

3/6

14 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. कारण यादिवशी  चांद्रयान 3 ची गती कमी केली जाणार असून  हा कक्षा बदलण्याचा अंतिम टप्पा असणार आहे.   

4/6

चांद्रयान 3 च्या Lander Horizontal Velocity Camera (LHVC) कॅमेऱ्याने हे पृथ्वीचे फोटो टिपले आहेत. यापूर्वी या कॅमेऱ्याने चंद्राचे फोटो पाठवले होते. 

5/6

चांद्रयान 3 च्या ऍडव्हान्स्ड कॅमेऱ्याने पृथ्वीचे फोटो पाठवले  आहेत. इस्रोनं हे फोटो ट्विट केले आहेत. 

6/6

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 हे अवकाशात झेपावले. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे आहे.