FASTag बाबत मोठं अपडेट, त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...

बँकेच्या क्रेडिट कार्डपासून ते FASTag पर्यंतचे नियम 1 ऑगस्टपासून बदलले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम? 

| Aug 01, 2024, 11:50 AM IST
1/7

नवा नियम

1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलले आहेत. NPCI ने FASTag संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. 

2/7

नियमाचे पालन

हे नियम आधीच लागू केले होते. मात्र, फास्टॅगचा KYC नियम ऑक्टोबरमध्ये नवीन आहे. 1 ऑगस्टपासून या नियमाचे पालन करावे लागणार आहे. 

3/7

काळ्या यादीत

शेवटच्या तारखेपर्यंत नियमांचे पालन न केल्यास फास्टॅगला काळ्या यादीत टाकले जाईल.

4/7

काळ्या यादीचे तोटे

जर FASTag ला काळ्या यादीत टाकले तर तो टोल प्लाझावर काम करणार नाही.  त्यामुळे तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो.

5/7

KYCचे अपडेट

ग्राहकाने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत KYC तपशील अपडेट करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय वाहनाची पुढील आणि मागील छायाचित्रे अपलोड करावी लागणार आहेत.   

6/7

जुना FASTag

जर तुमचा FASTag जुना असल्यास, तो बदलणे आवश्यक आहे आणि तुम्हाला नवीन FASTag घ्यावा लागेल. 

7/7

मोबाईल नंबर

1 ऑगस्टपासून प्रत्येक FASTag एका मोबाईल क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे. तसेच वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस नंबर FASTag शी लिंक करणे आवश्यक आहे.