Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 : आज छत्रपती शिवाजी महाराजांची 343 वी पुण्यतिथी; Messages, Images, WhatsApp Status मधून व्हा महाराजांपुढे नतमस्तक

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary : हिंदू हृदय सम्राट, महान पराक्रमी, हिंदवी स्वराजचे संस्थापक, राष्ट्र नायक थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी...त्यानिमित्त्याने  Messages, Images, WhatsApp Status द्वारे राजेंना करा अभिवादन

| Apr 03, 2023, 19:29 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 :  विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक ''मर्द मराठा शिवबा'' होऊन गेला.

अशा आपल्या थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 343 वी पुण्यतिथी (Shivaji Maharaj Punyatithi Date 2023) आहे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं दीर्घ आजाराने निधन झाले होते. (Celebrating Shivaji Maharaj Punyatithi in Marathi) सोशल मीडियाच्या जमान्यात Messages, Images, WhatsApp Status मधून महाराजांपुढे व्हा नतमस्तक...

1/8

एक विचार समानतेचा  एक विचार नीतीचा ना धर्माचा ना जातीचा राजा माधझा फक्त मातीचा 

2/8

सूर्यास्त होतो सूर्योद्य होतो, पण सूर्य कधीच विझत नाही 

3/8

रयतेपायी तो जन्मभर झिजला... रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला... मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला... असा एक शिवसूर्य रायगडी निजला...!

4/8

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळश आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ 

5/8

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे. आणि जो शिवरायांना स्वत:च्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

6/8

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

7/8

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही पण शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला

8/8

यशोवान् कीर्तिमान् सामर्थ्यवान् वरद:| पुण्यवान् नीतिवान् जनताजानन् राजा ||