Cheteshwar Pujara : कर्ज काढून आईने दिली बॅट; मात्र देशासाठी खेळताना पहायला 'ती' नव्हती

राहुल द्रविडनंतर भारतीय टीमचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला 'टीम इंडियाची वॉल' असं म्हटलं जातं. पुजाराचा जन्म 25 जानेवारी 1988 रोजी झाला होता. आज पुजाराचा वाढदिवस आहे.

Jan 25, 2023, 17:08 PM IST
1/5

भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला त्याच्या डिफेंसमुळे 'द वॉल' हे नाव मिळालंय. त्याच्या निवृत्तीनंतर, चेतेश्वर पुजारा डिफेंस फलंदाजीचा पुढील वारसदार बनला. आज म्हणजेच 25 जानेवारीला पुजारा 35 वर्षांचा झाला आहे.

2/5

क्रिकेटचा खेळ पुजाराला हा वारसा म्हणून मिळाला आहे. पुजाराचे आजोबा शिवपाल पुजारा उत्कृष्ट लेग-स्पिनर होते, वडील अरविंद आणि काका विपिन सौराष्ट्रकडून रणजी खेळलेत.  

3/5

पुजाराला महान फलंदाज बनवण्यात त्याच्या आईची फार मोलाची भूमिका आहे. मात्र त्या पुजाराला भारताकडून खेळताना कधीही पाहू शकल्या नाहीत.

4/5

चेतेश्वर पुजाराला त्याची पहिली बॅट खरेदी करण्यासाठी त्याच्या आईकडे जास्त पैसे नव्हते. यावेळी त्यांना आपल्या मुलाला कर्ज काढून बॅट घेऊन दिली. 

5/5

पुजाराला संथ गतीने खेळणारा फलंदाज मानलं जातं. मात्र तरीही त्याने टी20 मध्ये देखील शतक लगावलं आहे.