गुरुचरणी नतमस्तक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाठलं घर; स्वागतासाठी खास व्यक्तीची हजेरी

मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ठाण्यातील घरी, नातवाला पाहताचं एकनाथ शिंदे यांचा आनंद गगनात मावेना

Jul 05, 2022, 08:36 AM IST

राज्यातील तापलेल्या राजकीय वातावरणानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-भाजप सरकारने सोमवारी विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदा ठाण्यातील घरी पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी खास व्यक्तींनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक नमन केले.

 

1/10

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोंवर सर्वचं स्तरातू लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.   

2/10

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक नमन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन केले.  

3/10

ठाणे शहरात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य धर्मवीर आंनद दिघे यांच्या #ठाणे शहरातील शक्तीस्थळी उपस्थित राहून त्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील होते.   

4/10

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत्या घरी पोहोचल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. इन्स्टाग्रामवर कुटुंबाचे फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.   

5/10

6/10

यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे आजोबा आणि नातवाचं प्रेम.  विधानसभेत बोलताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नातवाचा उल्लेख केला. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

7/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'यासमयी अनेक दिवसांनी माझा नातू रुद्रांश याने मला पाहिल्यावर त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता. खरं सुखाची अनुभूतीच ही....'

8/10

9/10

10/10