Mood Booster Food: रागावर ताबा मिळवण्यासाठी या 4 पदार्थांच सेवन करा

मुंबई : माणसाचा मूड हा प्रत्येकवेळी एकसारखाचं असतो असं होत नाही. काही वेळा आनंदी असतो तर काहीवेळा दु:खी. काहीप्रसंगी तर चिडचिडपण खुप वाढतो. अशावेळी आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बिघडलेला मूड सुधारण्यासाठी काही पदार्थ खाण्याची गरज भासते, ज्यामुळे आपली मनस्थिती संतूलित राहील. आज आम्ही तुम्हाला अशा 4 पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी मूड बूस्टर ठरतील.

Oct 08, 2022, 18:05 PM IST
1/4

कॉफी

2016 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, कॉफी पिल्याने नैराश्य कमी होतं. 

2/4

डार्क चॉकलेट

एका अभ्यासानुसार, डार्क चॉकलेटचा आपल्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. याचं कारण असं मानलं जातं की, त्यात आढळलेल्या तीन गोष्टी आनंदाशी संबंधित आहेत, ट्रिप्टोफॅन, थेओब्रोमाइन आणि फेनिलेथिलालानिन. ट्रिप्टोफॅन हे अमीनो आम्ल आहे जे सेरोटोनिन तयार करण्यासाठी मेंदू वापरतो, तर थिओब्रोमाइन एक कमकुवत उत्तेजक आहे जो मूड सुधारू शकतो. त्याच वेळी, phenylethylalanine हे आणखी एक अमिनो अॅसिड आहे जे शरीरात डोपामाइन तयार करण्यास मदत करते, ते अँटीडिप्रेसंटची भूमिका बजावते.

3/4

नारळ

नारळात मध्यम शृंखला ट्रायग्लिसराइड जास्त असते ज्यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढू शकते. दुसर्‍या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, ते चिंता नियंत्रित करू शकतं. चिंता आणि नारळ यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी अजून अभ्यास करणं बाकी आहे.

4/4

केळी

केळी तुमच्या मूडवर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतात. केळीमध्ये पुरेशा प्रमाणात आढळणारे सेरोटोनिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी6 शरीराला आवश्यक असते. मध्यम आकाराच्या केळीमध्ये 0.4 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 6 असते, जे तुमच्या दैनंदिन गरजांच्या 25 टक्के असते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)