कोणता रंग आवडतो? फक्त हा एकच प्रश्न विचारा; लगेच समोरच्या व्यक्ताची स्वभाव कळेल

आवडत्या रंगावरुन ओळखा स्वभाव...

Sep 03, 2024, 23:46 PM IST

COLOUR AND NATURE : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणे खूप अवघड असते. संवाद साधताना हळू हळू स्वभाव कसा आहे ते समजेत. मात्र, बोलण होत नसेल तरी आपण आपण समोरच्याचा स्वभाव कसा आहे ते जाणून घेऊ शकतो. आवडत्या रंगावरुन समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कास आहे ते समजू शकतो. 

1/8

जोडीदार निवडताना त्याच्या स्वभाव कसा आहे समजूण घेणे खूप महत्वाचे असते. आवड्या रंगावरुन देखील तुम्ही समोरच्याचा स्वभाव कसा आहे ते समजून घेऊ शकता.  

2/8

गुलाबी रंग (Pink Colour)

गुलाबी रंग आवडणारे लोक स्वभावाने प्रेमळ, दयाळू असतात. त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक. ते जितके रोमँटिक असतात तितकेच ते भावनिक देखील असतात.  त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि उत्साही असतं.  

3/8

पांढरा रंग (White Colour)

पांढरा रंग आवडणारे लोक शांतता प्रिय असतात. ते विचार करून आपली मत मांडतात. ते दयाळू असतात. लोकांना मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.

4/8

हिरवा रंग (Green Colour)

हिरवा रंग आवडणारे दूरदृष्टीचे आणि खूप बुद्धिमान असतात. मनावर त्यांचा कंट्रोल असतो म्हणून ते डोक्याने निर्णय घेतात. ते प्रेमळ स्वभावाचे असतात.  

5/8

पिवळा रंग (Yellow Colour)

ज्यांना पिवळा रंग आवडतो ते आनंदी स्वभावचे असतात. हे लोक अतिश बोलके असतात. या गुणांमुळे यांची लगेच कुणाशीही मैत्री होते.  कामाच्या बाबतीत हे लोक खूप फोकस असतात.  

6/8

निळा रंग (Blue Colour)

अनेक जणांना निळा रंग आवडतो.  कुटुंबातील एकोप्याला ते महत्त्व देतात. यांचा स्वभाव रोमँटिक असतो. जोडीदारासोबतचं चांगले बॉंडिंग होते. अनेकदा हे लोक कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेतात.  

7/8

लाल रंग (Red Colour)

ज्यांना लाल रंग आवडतो ते सर्वकाही आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांना नातेसंबंध जपायला आवडतात. लाल रंग आवडणारे लोक दृढनिश्चयी असतात, ते त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतात.

8/8

काळा रंग (Black Colour)

काळा रंग अनेकजण अशुभ मानतात. मात्र, ज्यांना काळा रंग आवडतो ते लोक स्वत:वर जास्त प्रेम करतात.  त्यांना स्वतःला सर्वात शक्तिशाली दाखवायचं असतं. हे लोक दृढनिश्चयी असतात. त्यांचा आत्मविश्वास दांडगा असतो. हे लोक धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. कामाच्या ठिकाणी देखील ते आपली वेगळी छाप पाडतात.