दावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...

Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती. 

Apr 19, 2023, 11:54 AM IST

Rahul Gandhi in Bengali Market: भारत जोडो यात्रेपासूनच (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत लक्षणीयरित्या भर पडल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रस्थानी अतीव महत्त्वाचा हेतू ठेवत देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यापासून ते विरोधकांना सामोरं जाण्यापर्यंत प्रत्येक प्रसंगी राहुल गांधी यांनी त्यांच्या वेगळेपणानं माध्यमांचं लक्ष वेधलं आणि सर्वसामान्यांचं लक्षही वेधलं. 

 

1/7

Rahul Gandhi latest photos

Congress leader Rahul Gandhi visits in Bengali Market photos went viral

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व राजकीय घडामोडी आणि डावपेच दूर सारत राहुल गांधी नुकतेच एका अनोख्या सफरीवर गेले.   

2/7

where is Bengali Market

Congress leader Rahul Gandhi visits in Bengali Market photos went viral

ही सफर होती खाण्याच्या दुनियेतली. यासाठी त्यांनी दिल्लीच्या कनॉट प्लेस येथील चांदनी चौक भागात असणाऱ्या बंगाली मार्केटची निवड केली होती.    

3/7

Rahul Gandhi visits in Bengali Market

Rahul Gandhi in Bengali Market

पाणीपुरी, मोहोब्बत का शरबत, चाट अशा एक ना अनेक पदार्थांची चव यावेळी त्यांनी चाखली. 

4/7

Congress leader Rahul Gandhi visits in Bengali Market

Rahul Gandhi in Bengali Market

सहसा या भागात नेहमीच गर्दी असते. पण, त्या गर्दीचीही तमा न बाळगता त्यांनी या भागाला भेट दिली. 

5/7

Congress leader Rahul Gandhi

Rahul Gandhi in Bengali Market

सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेत त्यांनी यावेळी इथं असणाऱ्या नागरिकांशी आणि दुकान मालकांशी संवादही साधला. 

6/7

Rahul Gandhi photos

Rahul Gandhi in Bengali Market

सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या या खाद्यभ्रमंती दरम्यानचे अनेक फोटो व्हायरल झाले.   

7/7

Rahul Gandhi

Rahul Gandhi in Bengali Market

बंगाली मार्केटनंतर त्यांनी गाठली जुनी दिल्ली. तिथं इफ्तारीच्याच वेळी गेल्यामुळं राहुल गांधी यावेळी मुस्लिम बांधवांसोबत रमजानच्या महिन्यातील रोजानंतर खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चव चाखली.