कोरोना व्हायरसच्या भीतीने शिवलिंगाला घातला मास्क

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.

Mar 09, 2020, 16:43 PM IST

वारणसी : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या त्याचप्रमाणे मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. परिणामी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर वाराणसीमध्ये चक्क शिवलिंगाला मास्क घालण्यात आला आहे. 

1/5

वाराणसीच्या पहलादेश्वर महादेवाच्या मंदिरात भक्तांनी चक्क शिवलिंगाला मास्क घातला आहे.  

2/5

लोकांना जागृत करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे. 

3/5

शिवलिंगाला मास्क घातल्यामुळे हे मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

4/5

शिवाय मंदिर परिसरात बॅनर देखील लावण्यात आले आहेत. देवाला कोरोनापासून वाचवायचं आहे..., भोलेनाथाची रक्षा करायची आहे... अशा आशयाचे बॅनर याठिकाणी दिसत आहेत 

5/5

भारतात कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ४० कोरोनाग्रस्त पीडित भारतात सापडले आहेत.  रविवारी केरळमध्ये कोरोनाचे ५ रूग्ण समोर आले आहेत. जगभारातील मृतांचा आकडा ३ हजार ४०० वर पोहोचला आहे. ९० देशांतील १ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.