Genome Sequencing करणार कोरोनाचा खात्मा? जाणून घ्या याचा नेमका अर्थ

यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing. 

Dec 23, 2022, 09:52 AM IST

Corona Latest Updates : यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing. 

1/5

Coronavirus updates Genome Sequencing meaning and usage

रँडम सँपलिंगमध्ये ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान होत आहे त्यांचे नमुने पुढे Genome Sequencing साठी पाठवण्यात येत आहेत. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय? काही वैज्ञानिक संज्ञांचा आधार घेत याचा अर्थ समजता येऊ शकतो. 

2/5

Coronavirus updates Genome Sequencing meaning and usage

जिनोम सिक्वेन्सिंग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एता विशिष्ठ जीवाच्या कोशिकांचा प्रकार एकवटला जातो. त्याबाबतची माहिती मिळवली जाते. व्हायरस हासुद्धा कोशिकांचाच एक प्रकार असल्यामुळं जिनोम सिक्वेन्सिंगच्याच माध्यमातून त्याबाबतची माहिती मिळाली होती. 

3/5

Coronavirus updates Genome Sequencing meaning and usage

जिनोम सिक्वेन्सिंगमुळं व्हायरससंदर्भातील सविस्तर माहिती सहजपणे मिळते. यामध्ये  व्हेरिएंट, सबव्हेरिएंट सर्वकाही सहजपणे कळतं. 

4/5

Coronavirus updates Genome Sequencing meaning and usage

विषाणू किती धोकादायक आहे, इथपासून त्याच्यावर नियंत्रण कसं आणता येईल हे सर्वकाही जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतं. सध्याच्या घडीला भारतातही जिनोम सिक्वेन्सिंगवर जास्त भर देण्यात येत असून त्या माध्यमातून कोरोना नियंत्रणात ठेवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. 

5/5

Coronavirus updates Genome Sequencing meaning and usage

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीसुद्धा कोरोनाच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये चाचण्या आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्यावर भर देण्यास सांगितलं.