'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 

| Jun 02, 2020, 18:28 PM IST

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा तब्बल ६३ लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1,98,706 वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत या व्हायरसमुळे 5,598 जणांचा मृत्यू झाला आहे.

1/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

आपल्या देशात मृत्यूचं प्रमाण 2.82 टक्के इतकं आहे, जे जगातील सर्वात कमी मृत्यूचं प्रमाण आहे.

2/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट 48.07वर पोहचला आहे. तर देशभरात 95 हजार 527 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. 

3/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

देशात 1 जूनपासून 476 सरकारी टेस्टिंग लॅब आणि 205 खाजगी लॅब वाढवण्यात आल्या आहेत. देशभरात दररोज 1 लाख 20 हजार टेस्ट होत आहेत. 

4/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

असं असलं तरीही कोरोनावर अद्याप कोणतंही औषध अथवा लस सापडलेली नाही. जगभरात युद्धपातळीवर कोरोनाची लस शोधण्याचं काम सुरू आहे.

5/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीची आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

6/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

जूनपासून हे लसीकरण करण्यात येणार असून याकरता ५ ते १२ वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांना लस देणार आहेत. १०,२६० लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.

7/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

लंडन स्कूल ऑफ हायजीन ऍण्ड ट्रॉपिकल मेडिसिनच्या व्हॅक्सीन सेंटरचे संचालक आणि पीडियाट्रिक इंफेक्शन,  इम्युनिटीचे प्रोफेसर बिएट कॅम्पमॅन सांगतात की, हा अतिशय खासगी निर्णय आहे. पण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की, पुढे मला माझ्या मुलाकरता व्हॅक्सीनची गरज आहे का? 

8/8

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

'या' वयोगटातील लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीच्या प्रयोगाच्या पुढील टप्प्यात लहान मुलांवरही प्रयोग केला जाणार आहे.