PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील
भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
1/7
2/7
3/7
हार्दिक पंड्याकडे बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असून त्याला यातून वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. वर्ष 2024 मध्ये आर अश्विन, के एल राहुल, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या सोबत हार्दिकलाही बीसीसीआयचे ग्रेड ए चं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. हार्दिक पंड्याला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ऐवजी प्रत्येक सामने खेळण्यासाठी सुद्धा वेगळी मॅच फी मिळते. एका टेस्ट सामन्यासाठी त्याला 15 लाख, वनडे सामन्यासाठी 6 लाख तर टी 20 साठी 3 लाखांची फी मिळते.
4/7
2015 मध्ये हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद सुद्धा पटकावले. 2024 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला. हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून एका सीजनसाठी 18 कोटी रुपये मिळतात. तर आतापर्यंत आयपीएलचे १० सीजन खेळलेल्या हार्दिकने आयपीएलमधून 89.30 कोटी रुपये कमावले आहेत.
5/7
हार्दिक पांड्याचे इंस्टाग्रामवर जवळपास 34.7 मिलियन फॉलोअर्स असून सोशल मीडियावर प्रमोशनल पोस्टद्वारे देखील हार्दिक मोठी कमाई करतो. हार्दिककडे Gulf Oil India, Souled Soul, Dream 11, Monster Energy आणि BoAtin सारख्या ब्रँडना एंडॉर्स करतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हार्दिक मोठ्या प्रमोशनसाठी 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फी चार्ज करतो. क्रिकेट आणि जाहिराती वगळता हार्दिक पांड्याने वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. यात Aretto , Yu Foodlabs , Bidzapp आणि LenDenClub अशा कंपन्यांचा समावेश आहे.
6/7
30 कोटींचं घर :
7/7