टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज

भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे. 

Oct 08, 2024, 12:53 PM IST
1/6

अक्षर पटेल हा नुकताच झालेल्या भारत बांगलादेश टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा भाग होता. एकाही सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने खेळण्याची संधी मिळाली नाही. 

2/6

भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री त्याच्या पत्नीचा ओठभरण्याचा व्हिडीओ शेअर केला. अतिशय पारंपरिक गुजराती पद्धतीने पत्नी मेहा पटेलचा ओठभरण्याचा कार्यक्रम पार पडला. व्हिडीओ शेअर करताना अक्षरने 'आमच्या आयुष्यात खूप मोठं आनंद येणार' असे कॅप्शन दिले.   

3/6

अक्षरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा हिने कमेंट करून त्यांचे अभिनंदन केले. अक्षर पटेल हा वर्ल्ड कप २०२४ च्या विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. त्याने वर्ल्ड कपच्या अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी मोठे योगदान दिले. 

4/6

अक्षर पटेल याने 26 जानेवारी 2023 रोजी त्याची मैत्रीण मेहा सोबत वडोदरा गुजरात येथे शाही विवाह केला. अक्षरची पत्नी मेहा ही व्यवसायाने डायटिशन असून ती सध्या गुजरातमध्ये तिची प्रॅक्टिस करते. 

5/6

2011 मध्ये अक्षरने मेहाला प्रपोज केले होते. पण प्रपोज केल्यानंतर दोघांनी लगेच लग्नाचा विचार न करता त्यांच्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेण्याची संधी दिली.पती पत्नी म्हणून आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ शकतो असं समजल्यावर 2023 मध्ये त्यांनी लग्न केले.   

6/6

अक्षर पटेल याने आतापर्यंत भारतासाठी एकूण 14 टेस्टमध्ये 646 धावा आणि 55 विकेट्स घेतल्या आहेत. तर 60 वनडे सामन्यात त्यांनी 568 धावा आणि 64 विकेट्स घेतले. तसेच भारतासाठी 62 टी २० सामने खेळताना अक्षरने 463 धावा आणि 62 विकेट्स घेतल्या आहेत.