आताची मोठी बातमी! टीम इंडिया आता दिसणार नव्या जर्सीत, BCCI ने अचानक केली घोषणा

Team India New Practice Kit: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) येत्या 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) खेळवली जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) एक मोठी घोषणा केली आहे. टीम इंडिया आता नव्या जर्सीत (New Jersey) दिसणार असून याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

| May 25, 2023, 20:07 PM IST
1/5

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झालेआहेत. 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियातले काही खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत. 

2/5

लंडनच्या ओव्हल मैदानावर अंतिम सामना रंगणार असून भारतीय खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या ट्रेनिंग किटची घोषणा केली आहे. भारतीय खेळाडू सराव करताना आता नव्या जर्सीत दिसणार आहेत. 

3/5

बीसीसीआयने टीम इंडियातल्या खेळाडूंच्या सरावाचे काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोत टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि कोचिंग स्टाफ नव्या जर्सीत दिसत आहेत. 

4/5

एडिडस ही कंपनी टीम इंडियाच्या ट्रेनिंग किटचे स्पॉन्सर्स आहेत. तशी घोषणा बीसीसीआयने याआधीच केली होती. हा करार 2028 पर्यंत असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय टीम आता याच जर्सीत दिसणार आहे. 

5/5

एडिडास भारतीय पुरुष आणि महिाल क्रिकेट संघ, अंडर-19 संघाची जर्सी आणि किट बनवणार आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा सपोर्टिंग स्टाफच्या ट्रॅव्हल आणि ट्रेनिंग किटचाही समावेश असणार आहे.