कामिया जानी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची BJP ची मागणी; कामिया म्हणाली, 'मी हिंदू असून कधीच..'

Kamiya Jani On Temple Visit Row: तुमच्यापैकी अनेकांनी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर 'कर्ली टेल्स'च्या माध्यमातून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कामिया जानीचे व्हिडीओ पाहिले असती. हीच कामिया सध्या एका वादात अडकली असून यावरुन आता राजकारणही चांगलेच तापले आहे. नक्की झालंय काय? त्यावर कामिया काय म्हणाली आहे जाणून घ्या...

| Dec 25, 2023, 12:14 PM IST
1/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

'कर्ली टेल्स'च्या माध्यमातून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कामिया जानी वादात अडकली आहे. 

2/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

कामिया जानी प्रकरणामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी असी मागणी भारतीय जनता पार्टीबरोबरच काँग्रेसने केली आहे.

3/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

पण हे प्रकरण काय आहे आणि कामिया जानी काय म्हणालीय जाणून घेऊयात...

4/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

कामिया जानीने श्री जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश करण्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.

5/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

कामिया जानीने रविवारी आपली भूमिका मांडताना, "मी एक स्वाभिमानी हिंदू असून कधीच बीफ (गोमांस) खाल्लेलं नाही," असं म्हटलं आहे.  

6/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

एक व्हिडीओ बनवण्यासाठी कामिया जानी जगन्नाथ मंदिरात पोहोचली होती. यावरुन वाद झाला आहे.

7/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

या प्रकरणावरुन राजधानी भुवनेश्वरमध्ये विरोध प्रदर्शन झाल्यानंतर कामिया जानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

8/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

"पुरीमध्ये श्री जगन्नाथ मंदिरात जाण्यामागे माझा हेतू देवाचा आशिर्वाद घेण्याचाच होता. लोकांना मंदिराची माहिती देण्याची माझी इच्छा होती. मात्र यावरुन वाद झाला हे खेदजनक आहे," असं कामिया जानी म्हणाली.

9/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

बीजू जनता दलाचे व्ही. के. पांडियन यांनी कामिया जानीला मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत केल्याचा दावा केला आहे. 

10/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

कामिया जानीने, "मी एक हिंदू आहे. मी कधीच गोमांस खाल्लेलं नाही. तसेच गोमांस खाण्यासाठी मी कधी प्रोत्साहन दिलेलं नाही," असं म्हटलं आहे.

11/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

"मंदिर प्रशासनाने आपले स्वत:चे काही नियम आहेत. मी कोणताही नियम मोडला नाही हे मी सांगू इच्छिते. मी गोमांस कधीच खाल्लेलं नाही आणि त्यासाठी प्रोत्साहनही दिलेलं नाही," असं कामिया जानी म्हणाली.

12/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

आपण एक फूड ब्लॉगर आहोत, असं कामिया जानीने नमूद केलं आहे.

13/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

जगभरातील वेगवेगळ्या जागांवर जाऊन तेथील खाद्य संस्कृतीबद्दल, पर्यटनाबद्दल आपण लोकांना सांगतो, असंही कामिया जानी म्हणाली.

14/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

केरळमध्येही असं झालं. ज्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते मुद्दाम केले जात असून लोकांना चिथवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही कामिया जानी म्हणाली आहे.

15/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

"मी नियमांचा भंग केला चुकीचा समज असू शकतो. हा समज दूर करण्यासाठीच मी व्हिडीओ पोस्ट केला आहे," असं कामिया जानी म्हणाली आहे. मात्र कामिया जानी गोमांस सेवनाला प्रोत्साहन देत असल्याचा भाजपा आरोप आहे.

16/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

दुसरीकडे बिजू जनता दलाचे खासदार मानस मंगराज यांनी, "भाजपा सरकारने कामिया जानीला हिंदू संस्कृती आणि मंदिरांवर चित्रपट बनवण्यासाठी नियुक्त केलं आहे," असं म्हटलं आहे.

17/17

Food blogger Kamiya Jani after visit to Jagannath temple sparks row

"कामिया जानी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेली आहे. चारधाम यात्राही तिने केली आहे. तुम्ही सर्वजण तिच्यावर प्रेम करता," असं मंगराज म्हणालेत.