Cyclone Remal : वादळं किती प्रकारची असतात? जाणून घ्या कशी ठरते त्यांची तीव्रता

Cyclone Remal : महत्त्वाची बाब म्हणजे,  वादळांची तीव्रता नेमकी कशी ठरते आणि हवामान विभाग कोणत्या निकषांवर पूर्वसूचना देतं... जाणून घ्या महत्त्वाची माहिती 

May 27, 2024, 11:00 AM IST

Cyclone Remal : पश्चिम बंगालला धडकलेल्या आणि त्यामुळं ओडिशापासून बिहारपर्यंतच्या भागावर परिणाम करणाऱ्या रेमल या चक्रिवादळामुळं पुन्हा एकदा वादळं आणि त्यांच्यामुळं निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींनी डोकं वर काढलं. 

1/7

अतिवृष्टी

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

Cyclone Remal : रेमल चक्रीवादळाच्या धर्तीवर देशातील ओडिशा आणि पश्चिम बंगालसह बिहारलाही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. वादळाची तीव्रता पाहता मासेमारांनाही खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

2/7

वादळ

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

रविवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर बरंच उशिरा हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागावर धडकलं आणि पाहता पाहता त्यामुळं कोलकात्यासह राज्याच्या इतरही भागांमध्ये सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. 

3/7

र्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गेनायजेशन

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

राहिला प्रश्न वादळाच्या तीव्रतेचा, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गेनायजेशन (WMO) अर्थात जागतिक हवामान संस्थेनं वादळांची विभागणी 5 प्रकारांमध्ये केली आहे. ज्यामध्ये वाऱ्यांच्या वेगानुसार वादळांची श्रेणी ठरते.   

4/7

वाऱ्यांचा वेग

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

ताशी 119 ते 152 किमी इतक्या वेगानं वारे वाहिल्यास वादळ पहिल्या श्रेणीत येतं. इथं नुकसानाची शक्यता कमी असते. 

5/7

धोका

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

ताशी 154 ते 170 किमी इतक्या वेगानं वारे वाहून येणाऱ्या वादळाला द्वितीय श्रेणीत गणलं जातं. या वादळांमध्ये काही प्रमाणात नुकसान होतं. 

6/7

वादळाची मोजणी

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

170 ते 208 किमी प्रतितास इतक्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं येणाऱ्या वादळाची मोजणी तिसऱ्या श्रेणीमध्ये होते. यामध्ये होणारं नुकसान तुलनेनं जास्त असतं. 

7/7

वादळाची तीव्रता

Cyclone Remal know the meaning and Types Of storms

209 ते 251 प्रतितास इतक्या वेगानं वारे वाहून येणाऱ्या वादळाला चौथ्या श्रेणीमध्ये गणलं जातं. हे वादळ इतक्या ताकदीचं असतं की त्यामुळं इमारतीसुद्धा कोसळण्याची भीती असते. तर, प्रतितास 250 किमीहून अधिक वेगानं वारे वाहत येणारं वादळ प्रचंड नुकसान करतं. हे नुकसान अनेकदा इतकं भयंकर असतं की, त्याचा विचारही केलं जाणं निव्वळ अशक्य. या वादळामुळं मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते.