हिवाळ्यात केसातील कोंडा घालवायचाय? हे प्रभावी उपाय करूनच पाहा!

या कारणांमुळे डोक्यात खाज येणं, केस गळणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं या सारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून कायमची सुटका करायची असेल तर कोंड्यावर नियंत्रण आणावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया या समस्येवर कोणते उपाय आहेत?

Jan 28, 2024, 19:57 PM IST

थंडीच्या दिवसात केसामध्ये कोंडा होणं ही सामान्य समस्या आहे. पण हीच सामान्य वाटणारी समस्या पुढे जाऊन खूप त्रासदायक ठरते. मग अशा वेळी काय करावं? हे समजत नाही आणि कोंडा एकदा झाला कि तो पुन्हा नियंत्रणात आणणं खूप कठीण होऊन जातं. या समस्येचं मूळ कारण म्हणजे आपल्या आहारातून न मिळणारं पोषण...

1/6

लिंबू

फक्त लिंबाचा रस डोक्याला लावल्याने डोक्यावरील त्वचा खराब होण्याचा धोका असतो, त्यामुळे लिंबाच्या रसात दोन चमचे नारळाचं तेल घेऊन केसाला 5 ते 10 मिनिटं लावून ठेवायचे आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवायचे.

2/6

दही

केसातील कोंडा घालवण्यासाठी डोक्याला 10 ते 15 मिनिटं दही लावल्यानं कोंडा कमी होऊन केसांना पोषण मिळतं.

3/6

कंगवा

केस विंचरताना शक्यतो दुसऱ्याचा कंगवा वापरणं टाळावं, कारण यामुळे कोंडा निर्माण होण्याची शक्यता असते. तसंच आपला कंगवा हा स्वच्छ आहे की नाही याची देखील खात्री करून घ्यावी.

4/6

संत्री

संत्र्याच्या सालीचा रस करून 10 ते 15 मिनिटे लावून ठेवायचा आणि नंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धूवा. त्यामुळे केसांची योग्य निगा राखली जाते.  

5/6

अंडी

अंड्यातील पिवळा बलक घेऊन डोक्याला 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ केस धुवा. त्यामुळे केसांमध्ये मऊपणा येतो. 

6/6

कोरफड

कोरफडीचा गर देखील केसांसाठी खूप फायदेशीर असतो, त्यामुळे केस दाट आणि मुलायम होण्यास देखील मदत होते तसेच कोंडा देखील कमी होतो.    (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)