मुस्लिम अभिनेत्रीशी लग्न, वडील दारा सिंह यांच्या रागाचा करावा लागला सामना; वडिलांच्या निधनाच्या दिवशी केली पार्टी

अभिनेता आणि राजकारणी दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंगने वडिलांच्या निधनाच्या रात्री पार्टी केल्याने सर्वचजण थक्क झाले. त्याचबरोबर तब्बूची बहिण फराह आणि  विंदू दारा सिंग यांचे लग्नदेखील  चर्चेत राहिल होतं.

Aug 09, 2024, 15:54 PM IST

मुस्लिम अभिनेत्रीशी लग्न, वडील दारा सिंह यांच्या रागाचा करावा लागला सामना; वडिलांच्या निधनाच्या दिवशी केली पार्टी

1/8

विंदू दारा सिंह हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत.  विंदू दारा सिंह वडिलांप्रमाणे चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नाही तरी एक अभिनेता, मॉडेल, निर्माता आणि उद्योगपती म्हणून त्यांनी इंडस्ट्रित बरेच नाव आणि पैसा कमावला. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण चित्रपटातून त्यांनी पदार्पण करणाऱ्या विंदू दारा सिंह यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही नवी ओळख मिळवली, त्याचबरोबर सलमान खान सोबतही हिंदीचित्रपटांमध्ये काम केले.   

2/8

दारा सिंग यांनी दिग्दर्शित 1996 मध्ये दिग्दर्शित केलेल्या  'रब दिया रखान' या पंजाबी चित्रपटांमध्ये विंदू दारा सिंग यांनी काम केले आहे त्याचबरोबर त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय स्टर प्लसवरील टीव्ही मालिकेतही खलनायकाची भूमिका साकारली होती. तसच मास्टर शेफ 2, जोर का झटका, नच बलिए, कॉमेडी सर्कस, ऑल मोस्ट फेमस आणि माँ एक्सचेंज यांसारख्या काही टीव्ही कार्यक्रमातही विंदू दारा सिंग यांनी काम केले आहे. 

3/8

विंदू दारा सिंग, तब्बू आणि फराह हे एकाच डान्स क्लासला जात होते. त्याचवेळी त्यांच्या ओळख झाली आणि विंदूने फराहला थेट लग्नाची मागणी घातली.

4/8

फराहसोबत लग्नकरण्याआधी विंदूचे वडिल दारा सिंग म्हणाले होते की, दोघांपैकी कोणीही जास्त धार्मिक झाले तर नात्यामध्ये अडचणी येऊ शकतात. विंदूने एका मुलाखतीत असे सागिंलते होते की फराह खूप बोल्ड होती, अनेकांनी नकार देऊनही ती सिगारेट ओढायची.   

5/8

त्यानंतर फराहने असे देखील म्हटले होते की पूर्वी फराह फारशी धार्मिक नव्हती पण हजच्या धार्मिक प्रवासानंतर ती खूप धार्मिक झाली. यामुळे आमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला.   

6/8

2009 मध्ये विंदू दारा सिंगने सुद्धा वडिलांप्रमाणे हनुमान मालिकेत हनुमानाची भूमिका बजावत यश मिळवले.यानंतर तो बिग बॉस सीझन 3 मध्ये जिंकला. 2013 मध्ये विंदूचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्याने पोलिसांनी विंदूला अटकही केली मात्र त्यावेळी स्थानिक न्यायालयाने विंदूला जामीन मिळवून दिला. 

7/8

ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांनी वयाच्या 83 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दारा सिंग याच्या निधनाने चाहते दु:खी झाले. एवढी वर्ष टीव्ही ते चित्रपट या प्रवासात त्यांना चाहत्यांची कमतरता कधीच नव्हती. 

8/8

दारा सिंग यांच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ काननने विंदू सिंगला वडिलांच्या मृत्यू संबंधित विचारले तेव्हा विंदू दारा सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित ही गोष्ट शेअर केली आणि म्हणाले की, पप्पा म्हणायचे की माणसाने प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.मृत्यूला घाबरा कारण तो एक दिवस येणारच आहे.माणसाच्या मृत्यूवर शोक न करता आनंद घ्यावा कारण हेच एक सत्य आहे.