Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय

Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

| Aug 04, 2024, 09:45 AM IST
1/11

दीप अमावस्येला वृक्षारोपण करण्याचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे आज आंबा, आवळा, केळी, लिंबू, तुळस, पीपळ, वटवृक्ष आणि कडुलिंबाची झाडे लावा. वृक्षारोपण केल्याने ग्रह, नक्षत्र आणि पितृदोष शांत होता आणि  पैशाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

2/11

या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग आणि दुःख नाहीसे होतात असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. त्याच्या निर्मूलनाने जीवनातील आर्थिक समस्या दूर होते अशी मान्यता आहे. 

3/11

दान करण्यासोबतच या दिवशी दिवा देखील दानाला महत्त्व आहे. या दिवशी पिठाचे दिवे लावून ते नदीत अर्पण केल्यास पितृदेव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. या दिवशी शनिदेवजीच्या मंदिरात विधीनुसार दिवा लावा. यामुळे घरातील आर्थिक संकट दूर होते अशी मान्यता आहे. 

4/11

या दिवशी नदी किंवा तलावावर जाऊन माशांना पिठाचे गोळे खाऊ घातल्यास धन-समृद्धी लाभते अशी ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

5/11

या दिवशी घराजवळील मुंग्यांना साखर मिसळून कोरडे पीठ खाऊ घातल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि समृद्धीचा मार्ग खुला असा उपाय शास्त्रात सांगितलाय.

6/11

दीप अमावस्येला रात्री पूजा करताना पूजेच्या ताटात स्वस्तिक किंवा ओम काढा आणि त्यावर महालक्ष्मी यंत्र ठेवा. या यंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मी माता घरात वास करते आणि सुख - समृद्धी आणणते अशी मान्यता आहे. 

7/11

या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर त्याला दक्षिणा द्यावी. मंदिराबाहेर बसलेल्या कोणत्याही गरीब व्यक्तीला अन्नदान करा किंवा दान करा. दान केल्याने संपत्ती वाढ होत असा ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आलाय. 

8/11

दर्श अमावस्येला भगवान शिवाची विशेष पूजा करावी. अंजिराची पांढरी फुले, बिल्वची पाने आणि भांग आणि धतुरा भगवान शंकराला अर्पण करा. भगवान शिव आणि श्री विष्णूच्या मंत्रांचा जप केल्यामुळे आर्थिक संकट दूर होतात. 

9/11

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितृशांतीचे उपाय केले जातात. नदी किंवा तलावात स्नान करा. या दिवशी पितृसूक्त पठण, गीता पठण, गरुड पुराण, गजेंद्र मोक्ष पठण, रुची कृत पितृ स्तोत्र, पितृ गायत्री पठण, पितृ कवच किंवा पितृदेव चालीसा यांचे पठण आणि आरती करावी.

10/11

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा केली जाते. यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात, अशी मान्यता आहे. 

11/11

या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पाठ करा आणि हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. यामुळे तुमचे सर्व त्रास संपतील आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)