गर्लफ्रेंडच्या रक्ताने भरलं पत्नीच्या भांगेत कुंकू, श्रद्धा वालकरपेक्षाही भयानक हत्याकांड, तुमचाही होईल थरथराट

Murder on Valentine's Day: दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder) हत्याकांडाशी साम्य असणारं आणखी एक भयानक प्रकरण समोर आलं आहे. हे हत्याकांड पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. बाबा हरिदास नगर येथील ढाब्यावर तरुणीची हत्या करुन तिला मृतदेह फ्रीजरमध्ये लपवण्यात आला होता. तरुणीच्या प्रियकरानेच ही हत्या केली. दोघेही पाच वर्षांपासून नात्यात होते.   

Feb 15, 2023, 09:08 AM IST
1/6

साहिल गहलोत असं प्रियकराचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.   

2/6

3/6

साहिलने काश्मीर गेट आयएसबीटीजवळ एका गाडीत प्रेयसीचा गळा दाबला आणि नंतर मित्रौ गावातील एका ढाब्यातील फ्रिजरमध्ये लपवला.   

4/6

पोलिसांनी याप्रकरणी रोहित गहलोत नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस त्याचीही चौकशी करत आहेत.   

5/6

साहिलने लग्न केल्याने प्रेयसी नाराज होती आणि आपल्या नात्यासंबंधी आपल्या नातेवाईकांना सांगण्यास सांगत होती. पण साहिल यासाठी तयार नव्हता आणि यावरुन त्यांच्यात भांडण होत होतं.   

6/6

9-10 फेब्रुवारीच्या रात्री साहिलने प्रेयसीला काश्मीरी गेट आयएसबीटीजवळ भेटायला बोलावलं. यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x