'माझ्यासोबत 2 महिने...', दिग्दर्शकानं 'चांदनी' फेम अभिनेत्रीसमोर ठेवली होती विचित्र अट!

अभिनेत्री यश चोप्रा यांनी दिग्दर्शन केलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या 'चांदनी' मध्ये श्रीदेवी यांच्या मैत्रिणीची भूमिका साकरून लाइमलाइटमध्ये आली होती. या चित्रपटानंतर अभिनेत्रीनं वळून पाहिलं नाही. पण अनेक वर्षांनंतर चित्रपटसृष्टीतील एक सत्य समोर आलं आहे. चित्रपटसृष्टी किंवा छोट्या पडद्यावर काम करणं काही लोकांसाठी खूप कठीण ठरतं. त्यानंतर अनेकांना कास्टिंग काऊच, भेदभाव आणि अनेकदा चित्रपट दिग्दर्शक यांच्याकडून आलेल्या विचित्र मागण्यांचा सामना करावा लागतो. 

| Jun 04, 2024, 19:17 PM IST
1/7

अभिनेत्री मीता वशिष्ठसोबत घडला धक्कादायक प्रकार

अभिनेत्री मीता वशिष्ठनं चित्रपट आणि छोट्या पडद्यावर असं दोन्ही ठिकाणी काम केलं आहे. मीतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आणि सांगितलं की फक्त एका अटीमुळे त्यांनी लीड रोलला नकार दिला होता. 

2/7

लीड रोलसाठी मिळाली ऑफर

मीता वशिष्ट या नेहमीच बॉलिवूडमध्ये लीड स्टारची बहीण किंवा मग मैत्रिणीच्या भूमिकेत जास्त दिसल्या. त्यांना दाक्षिणात्य चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. पण विचित्र अटीमुळे त्यांनी या ऑफरला नकार दिला.  

3/7

'हा' होता पहिला चित्रपट

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून ग्रॅज्युएशनमधून मीता वशिष्ठ यांनी 1987 मध्ये चित्रपटसृष्टीत 'वर वर वारी' चित्रपटातून पदार्पण केलं. पण 1989 मध्ये त्यांनी 'चांदनी' या चित्रपटात श्रीदेवी यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

4/7

कास्टिंग काऊचचा खुलासा

मीता वशिष्ट यांनी 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे. मीता वशिष्ठ यांनी सांगितलं की एकदा त्यांना लीड रोलच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. पण जेव्हा दिग्दर्शकांनी एक विचित्र अट ठेवली तेव्हा त्यांनी नकार दिला. 

5/7

दिग्दर्शकानं ठेवली अट

मीना यांनी सांगितलं की 'त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली होती की मी दोन महिन्यांसाठी त्यांच्यासोबत रहावं. पण मी त्यासाठी तयार झाले नाही आणि म्हटलं तुमची भूमिका तुमच्या जवळ ठेवा आणि मी तिथून निघाले. त्याच क्षणी मी त्या भूमिकेला नकार दिला.' 

6/7

आधी काय वाटलं?

मीता वशिष्ठनं पुढे सांगितलं की 'सुरुवातीला माझी इंग्रजी चांगली नव्हती. त्यामुळे मला वाटलं की इंग्रजी शिकण्यासाठी मला चेन्नईला राहण्यासाठी सांगत आहेत. पण जेव्हा मला कळलं की ते मला तडजोड करण्यास सांगत आहेत. तर मला संशय झाला आणि त्यानंतर तिनं या ऑफरला लगेच नकार दिला.'   

7/7

'या' मालिकांमध्ये काम

चित्रपटांशिवाय मीता वशिष्ठनं अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील काम केलं. स्पेस सिटी सिग्मा, पचपन खंभे लाल दीवारें, स्वाभिमान, अलान, कहानी घर घर की आणि काला टीका सारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.