मुंबई, माळीण, तळीये आणि आता इरसालवाडी, मोठ्या दुर्घटना जुलै महिन्यातच का घडतात?

July Disasters List : माळीण, तळीये त्यानंतर आत्ता इरसालवाडीमध्ये (Khalapur Irshalgad Landslide) भूस्खलन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेलाय. सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालं आहे. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू (16 Death) झालाय..तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृत्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे याआधी महाराष्ट्रात पावसामुळे ज्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यातला बऱ्यापैकी घटना या जुलै महिन्यात (July Month) घडल्या आहेत. पाहूयात हा सर्व घटनाक्रम

| Jul 20, 2023, 20:02 PM IST

1/9

26 जुलै 2005 रोजी मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस अनुभवला. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता.

2/9

यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 

3/9

मुंबईच्या या पावसात 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. 

4/9

24 जुलै 2005 महाडमध्ये दरड कोसळली दासगाव, जुई, कोंडिवतेमध्ये दरड कोसळली

5/9

महाडमध्ये घटनलेल्या या दुर्घटनेत 194 जणांचा मृत्यू

6/9

भीमाशंकरजवळ पुण्यापासून 75 ते 80 किमीवरील डिंभे धरणाच्या परिसरात वसलेलं माळीण गाव. आंबे तालुक्यातील 44 उंबऱ्याचं अख्ख माळीण गावच 30 जुलै 2014 रोजी पहाटे धडाम असा आवाज येत धरणीच्या कुशीत सामावले गेले. 

7/9

या भीषण दुर्घटनेत एकूण 151 जणांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यात महिला पुरुष त्यांची लहान मुलं यांचा समावेश होता. या गावाची लोकसंख्या 175 इतकी होती

8/9

रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता दरड कोसळली.  डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनलं. 

9/9

दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली. जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले, उरलेले सर्व दरडीखाली दबले गेले.तळीयेच्या दुर्घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला