Diwali Pujan Muhurat 2023 : दिवाळीला 700 वर्षांनंतर 5 राजयोगासह 8 शुभ योग! 'या' शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजन

Diwali Pujan Muhurat 2023 : आज देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार तब्बल 700 वर्षांनंतर 5 राजयोगासह 8 शुभ योग जुळून आला आहे. जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त.  

Nov 12, 2023, 09:01 AM IST
1/7

हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीसह गणेश आणि सरस्वतीची पूजा करण्यात येते. अमावस्येला आलेली दिवाळीला कालरात्री असंही म्हणतात. 

2/7

या दिवशी विधीवत लक्ष्मी माता आणि भगवान गणेशाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी नांदेत असा विश्वास आहे. यंदाची दिवाळी अतिशय खास आहे, तब्बल 700 वर्षांनंतर 5 राजयोगासह 8 शुभ योग तयार झाले आहेत. 

3/7

अशा या दुर्मिळ योगायोगात कुठल्या वेळी लक्ष्मीची पूजा करायची जाणून घ्या शुभ मुहूर्त  

4/7

सकाळची वेळ - 08:09 ते 12:12 वाजेपर्यंत, दुपारी - 01:32 वाजेपासून 02:52 वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त - सकाळी 11:48 ते दुपारी 12:34 वाजेपर्यंत   

5/7

लक्ष्मी उपासनेची सर्वोत्तम वेळ - संध्याकाळी 06:01 ते 06:16 वाजेपर्यंत

6/7

प्रदोष काल - संध्याकाळी 05:51 ते रात्री 07:48 वाजेपर्यंत वृषलग्न संध्याकाळी ते पर्यंत    

7/7

चंद्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे गजकेसरी, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धार हे पाच राजयोग निर्माण होत आहेत. यामुळे अनेक राशींच्या लोकांना धनलाभ, संपत्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)