तुम्हीही ड्रायव्हिंग करताना Google Map वापरताय? 'हे' 5 फीचर्स वापरा अन् कमाल पाहा!

गुगलच्या विविध सेवांमुळे ग्राहकांचा फायदा झाल्याचं दिसून येतं. एखाद्या ठिकाणी जायचं झाल्यास आपण इकडं तिकडं विचारत न बसता, मदत घेतो ती गुगल मॅप्सची (Google Maps). गुगलची ही नेव्हिगेशन सेवा, आजकाल खूप फायद्याचं ठरत असल्याचं दिसतंय. तुम्हीही अनेकदा गुगल मॅपचा फायदा घेत असालच. मात्र, तुम्हाला गुगल मॅचच्या या फिचर्सविषयी माहिती असायलाच हवी.

Jun 25, 2023, 16:42 PM IST

Google Maps Latest Features: गुगलच्या विविध सेवांमुळे ग्राहकांचा फायदा झाल्याचं दिसून येतं. एखाद्या ठिकाणी जायचं झाल्यास आपण इकडं तिकडं विचारत न बसता, मदत घेतो ती गुगल मॅप्सची (Google Maps). गुगलची ही नेव्हिगेशन सेवा, आजकाल खूप फायद्याचं ठरत असल्याचं दिसतंय. तुम्हीही अनेकदा गुगल मॅपचा फायदा घेत असालच. मात्र, तुम्हाला गुगल मॅचच्या या फिचर्सविषयी माहिती असायलाच हवी.

1/5

ऑफलाईन मॅप डाऊनलोड करा

प्रवास करताना सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो, तो नेटवर्कचा. नेव्हिगेशन अॅप्सचा वापर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने देखील करता येतो. त्यानुसार तुम्ही डाऊनलोड करू शकता.

2/5

नेमका वाहतूकीचा मोड निवडा

नेव्हिगेशन अॅप्सचा वापर करताना तुम्ही नेमकं कोणत्या गाडीने प्रवास करणार आहात. याची योग्य ती माहिती देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य आणि लवकर पोहोचाल, असा मोड निवडता येतो.

3/5

लाईव्ह ट्रॅफिक अपडेट ऑन करा

गुगल मॅपवर लाईव्ह ट्रॅफिक अपडेट एनाबल केलं तर रिअल टाइम अपडेट्स मिळवता येतात. त्यामुळे तुम्ही ऐनवेळी वेगळ्या मार्ग निवडू शकता.

4/5

व्हॉइस नेव्हिगेशन चालू करा

अनेकजण गाडी चालवत असताना हेडफोन्स वापरत असतात. व्हॉइस नेव्हिगेशन चालू ठेवलं तर सतत मोबाईलमध्ये डोकवण्याची गरज नाही. आवाजाच्या निर्देशानुसार तुम्ही गाडी योग्य ठिकाणी पोहचवू शकता.

5/5

टोल किंमत एनाबेल करा

टोलच्या किमतीची माहितीही गुगल मॅप्स देऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही लांबच्या प्रवासात नेमका टोल किती बसतोय, याची माहिती पाहू शकता.