दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही

तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.

Jan 01, 2025, 21:36 PM IST

alcohol Expiry:तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.

1/8

दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

alcohol Expiry: वाइन जितकी जुनी तितकी तिची चव चांगली असते, असं म्हणतात. पण प्रत्येक वाईनच्या बाबतीत असे होत नाही. काही वाइनची चव जुनी होण्यासोबत चांगली असेलच असे नाही. अनेक महिने राहिलेली स्कॉच किंवा जिनची बाटली रिती करण्याचे शौकीन अनेकजण असतात.पण आपल्या आरोग्यासाठी हे चांगले असते का?

2/8

शेल्फ लाइफ

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसे व्हिस्कीचे शेल्फ लाइफ अनिश्चित असते. परंतु 1-2 वर्षांनी उघडल्यानंतर त्याची चव देखील कमी होऊ लागते. कोणती दारु किती दिवस ठेवता येते? जाणून घ्या.

3/8

बिअर

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

बिअर दारूपेक्षा लवकर एक्स्पायर होते. साधारणपणे बिअर 6 महिन्यांत एक्स्पायर होते. कॅन असो किंवा बिअरची बाटली, एकदा उघडली की ती एक-दोन दिवसांत संपली पाहिजे. एकदा उघडल्यानंतर, हवेतील ऑक्सिजनच्या ती संपर्कात येते. ज्याला ऑक्सिडेशनदेखील म्हणतात. त्यामुळे तिची चव खराब होते. एक दिवसानंतर फिझ देखील बंद होतो. चव टिकवून ठेवण्यासाठी बिअर नेहमी थंड आणि गडद ठिकाणी ठेवातात.

4/8

व्हिस्की

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

हे एक हार्ड ड्रिंक आहे जे वेळेनुसार जुनी होत नाही. एकदा बाटली उघडल्यानंतर ऑक्सिडेशन होते ज्यामुळे तुमच्या पेयाची चव आणि फ्लेवर बदलतो. व्हिस्कीची बाटली ज्या तापमानात साठवली जाते आणि प्रकाशाच्या संपर्कात राहते ते देखील तुमच्या पेयाच्या चवीवर परिणाम करू शकते. व्हिस्की देखील, आपण अत्यंत मर्यादित हवेच्या संपर्कासह गडद आणि थंड ठिकाणी ठेवली जाते. तसेच व्हिस्कीची बाटली नेहमी सरळ ठेवतात. कारण मजबूत मद्य आडवे ठेवल्यावर बाटलीचे कॉर्क पातळ करू शकते. ज्यामुळे ऑक्सिडेशन प्रक्रियेला गती मिळते.

5/8

रम

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

एकदा रम बाटलीचे सील उघडले की, ऑक्सिडेशन प्रक्रिया जलद होते ज्यामुळे तिची झपाट्याने बिघडते तसेच चव देखील संपते. जर रमची बाटली उघडली असेल तर ती एका छोट्या बाटलीत भरून ती चांगली बंद करून ठेवा. अशाने रमची चव आणि सुगंध कमी न होता ती कमीतकमी 6 महिने साठवली जाऊ शकते.

6/8

वाइन

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

वाइनचे शेल्फ लाइफ मर्यादित आहे. ऑक्सिडेशनमुळे वाइनची चव सहजपणे बदलू शकते. ॲसिटिक ऍसिडची पातळी वाढते आणि त्याची चव सपाट होते. यामुळे प्रत्यक्षात वाइन व्हिनेगरमध्ये बदलू शकते. तुमची आवडती वाइन शिळी होऊ शकते आणि तिला व्हिनेगरचा वास येऊ शकतो. साधारणपणे तीन ते पाच दिवसच वाइन पिण्यायोग्य राहते.

7/8

टकीला

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

बाटली उघडल्यानंतर टकीला खूप लवकर खराब होऊ शकते. टकीला बाटली जितकी जास्त वेळ उघडी राहते तितकी ती तिची ताकद आणि सुगंध गमावते. जर तुमच्या घरात टकिलाची बाटली एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर ती हानिकारक नसेल. पण जर टकीला शॉट घेण्यापूर्वी त्याचा वास चांगला येत नसेल तर त्याचा वापर करू नका.

8/8

डिस्क्लेमर

Does alcohol have Expiry Consumption good or bad Health Marathi news

(Desclaimer: हा लेख केवळ माहितीसाठी असून कोणत्याही प्रकारचे पेय घेण्यास दुजोरा देत नाही. कोणतंही व्यसन हे वाईटच असतं.)