जन्माष्टमीच्या सजावटीत 'या' वस्तूंचा चुकूनही वापर करू नका

श्रीकृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.  

Aug 23, 2024, 13:12 PM IST

जन्माष्टमीला आकर्षक सजावटदेखील केली जाते. पण या सजावटीत काही वस्तूंचा वापर करण वर्ज्य मानलं गेलं आहे. 

 

1/7

जन्माष्टमीच्या सजावटीत 'या' वस्तूंचा चुकूनही वापर करू नका.  

2/7

हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यावर्षी 26 अॅागस्ट 2024 ला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जाणार आहे. यावेळी सजावट करताना काही वस्तूंचा वापर करण अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे.

3/7

श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोकुळअष्टमी  असंदेखील म्हटलं जातं.यादिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरी करण्याची परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे.ज्‍योतिषाचार्य पंडित शशिशेखर त्रिपाठी यांनी जन्माष्टमीची सजावट करताना कोणत्या विशेष गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सांगितल आहे.

4/7

   जन्माष्टमीची सजावट करताना काटेदार झाडांच्या पानांचा वापर करण टाळावं.त्याऐवजी आंब्याचे टाळ,अशोकाच्या पानांचा वापर करावा.ही पान शुभता आणि समृद्धीचं प्रतीक मानली जातात.यामुळे पूजेत पावित्र्य राहतं.सजावटीत चीक निघतो अशा पानांचा वापर करण वर्ज्य आहे.सजावटीसाठी हानिकारक आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करण टाळावं.

5/7

मोरपंखाचा वापर जन्माष्टमीच्या सजावटीत आवश्य करावा.श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे.श्रीकृष्णाच्या मुकुटावर नेहमी मोरपीस असतं.मोरपीसासोबत त्यांच्या जीवनातील अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत.याशिवाय या सजावटीत बासरीचादेखील वापर करावा.बासरी सजवून ती सजावटीत ठेवावी.कारण बासरी श्रीकृष्णाच्या ओळखीच प्रतीक मानलं जातं.सजावटीत गाय वासराची मूर्ती किंवा फोटो अवश्य ठेवावा.हे चित्र गोपगोपींच्या प्रेमाचं प्रदर्शन करतात.या सजावटीत त्यांच्या बालपणापासूनच्या सर्व लीलांची छायाचित्र लावावी.श्रीकृष्णांच्या विराट स्वरूपाचदेखील चित्र लावाव.मात्र महाभारताच चित्र  या पूजेत लावण वर्ज्य मानलं गेलं आहे.या पूजेच सहा दिवसांपर्यंत पूजन करावं आणि रोज आरती करावी.त्यानंतर या पूजेचं विसर्जन करावं.

6/7

श्रीकृष्ण जन्माष्टमीला पंचपक्वान्न,पंचामृत आणि सुंठवड्याचा प्रसाद बनविण्याची परंपरा आहे.श्रीकृष्णाला लोणी साखर सुद्धा अत्यंत प्रिय आहे.

7/7

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)