तुम्ही Body Detox करण्याचा विचार करताय? मग 'या' टिप्स वापरा

जेव्हा शरीरात बरेच विषारी पदार्थ जमा होतात आणि शरीराला ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, तेव्हा शरीराला मदत म्हणून डिटॉक्ससाठी काही उपाय करावे लागतात.

Jul 03, 2022, 20:43 PM IST

मुंबई : आजकाल बॉडी क्लीन्स किंवा बॉडी डिटॉक्स करणं खूप गरजेचं झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि आपला आहार. जेव्हा शरीरात बरेच विषारी पदार्थ जमा होतात आणि शरीराला ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, तेव्हा शरीराला मदत म्हणून डिटॉक्ससाठी काही उपाय करावे लागतात.

1/5

पुरेसं पाणी प्या

शरीर नीट चालण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील आणि पोटातील घाण साफ होते. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावं, यामुळे तुमच्या आतील घाण बाहेर पडते आणि शरीर स्वच्छ होते.

2/5

झोप घ्या

पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. शरीराची संपूर्ण यंत्रणा त्यावर अवलंबून असते, झोप नीट झाली तर तुमचे काम व्यवस्थित होतं आणि शरीर व्यवस्थित चालतं. दररोज साधारणत: 7-8 तास झोप घेतली पाहिजे.

3/5

दररोज व्यायाम करा

दररोज व्यायाम, धावणे आणि प्राणायाम केल्याने तुमच्या शरीरातील घाण साफ होते. तुम्ही निरोगी राहता आणि तुम्हाला सर्व रोगांशी लढण्याची ताकद मिळते.

4/5

रस

असे अनेक रस आहेत जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात, शरीर आतून स्वच्छ करतात. बाटलीचा दुधी भोपळ्याचा ज्यूस, कारले आणि कोरफडीचा रस देखील आतून घाण साफ करतो.

5/5

निरोगी आहार घ्या

जंक फूडच सेवन करणं टाळावं, शक्यतो जेवनात योग्य आहाराचाच समावेश करा. हिरव्या भाज्या, फळे आणि ज्यूस तुमच्या आतली घाण काढून पोट हलकं ठेवण्यास मदत करेल.