Turkey Earthquake : भूकंपामुळे 2300 लोकांचा मत्यू; तुर्कस्तान, सिरियातील थरारक फोटो

भीषण भूकंपाने तुर्कस्तान हादरला, 7.8 रिश्टर स्केलची नोंद. तुर्कस्तान आणि सीरियात 2300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे (Earthquake kills 2300 civilians in Turkey and Syria). 

Feb 07, 2023, 00:13 AM IST

Middle East Turkey Earthquakes : तुर्कस्तानात २४ तासांत तीन भूकंप (Turkey Earthquake) झाले आहेत. काल रात्रीच्या भूकंपानंतर आज दुपारी ४ च्या सुमाराला आणि सहाच्या सुमाराला आणखी दोन धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर 7.5 आणि सहा एवढ्या तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेलेत. सीरिया, सायप्रस, ग्रीस, लेबनॉन, जॉर्डन, इजिप्त आणि इस्त्राईलमध्येही धक्के जाणवलेत (Earthquake kills 2300 civilians in Turkey and Syria). 

1/5

 भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. दिवसभरात तुर्कीला भूकंपाचे छोटे मोठे तब्बल 39 धक्के बसले आहेत.   

2/5

या भूकंपात 1हजार 710 इमारती जमीनदोस्त झाल्या असून प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

3/5

या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची  माहिती समोर आली आहे. 

4/5

800 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

5/5

तुर्की आणि सीरियात आतापर्यंत 2300 लोकांचा मृत्यू झाला आहे.