काळपट पडलेली चांदीची भांडी अवघ्या 10 मिनिटांत करा स्वच्छ; ही सोप्पी टिप लक्षात ठेवा

चांदीची भांडी पुजेसाठी किंवा घरात एखादे कार्य असेल तर वापरली जातात. अन्यथा ती रोजच्या वापरात येत नाही. सतत वापरात नसल्याने कधीकधी चांदीची भांडी काळवंडतात. अशावेळी ती स्वच्छ करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरा या टिप्स 

| Dec 31, 2023, 18:21 PM IST

How To Clean Your Sterling Silver Jewellery: चांदीची भांडी पुजेसाठी किंवा घरात एखादे कार्य असेल तर वापरली जातात. अन्यथा ती रोजच्या वापरात येत नाही. सतत वापरात नसल्याने कधीकधी चांदीची भांडी काळवंडतात. अशावेळी ती स्वच्छ करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरा या टिप्स 

1/7

काळपट पडलेली चांदीची भांडी अवघ्या 10 मिनिटांत करा स्वच्छ; ही सोप्पी टिप लक्षात ठेवा

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातल्या वस्तूंचाही वापर करु शकता. जास्त मेहनत न घेता तुम्ही घरातच्या पदार्थांचा वापर करुन अगदी 10 मिनिटांत तुम्ही काळी पडलेली चांदीची भांडी स्वच्छ करु शकता. 

2/7

चांदीची भांडी स्वच्छ

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

चांदीची भांडी काळवंडतात तेव्हा तो काळा रंग हा त्याच्या पृष्ठभागावर साचलेला सल्फाइडचा एक थर असतो. त्यामुळं साध्या उपायांनाही चांदीची भांडी स्वच्छ करु शकतात. 

3/7

साहित्य

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

अ‍ॅल्युमिनियम फॉइल, गरम पाणी आणि बेकिंग सोडा यांचा वापर करुन आपण हे सल्फाईड दूर करू शकता.

4/7

सल्फर आयन

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

 या प्रक्रियेमध्ये अॅल्युमिनियम हे सिल्व्हर सल्फाइडसोबत प्रतिक्रिया करून अॅल्युमिनियम सल्फाइड तयार करते आणि सल्फर आयन सोडते.   

5/7

काळपट पणा दूर होतो

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

गरम पाणी आणि बेकिंग सोडा अल्कधर्मी वातावरण तयार करून ही प्रक्रिया करण्यास मदत करतात तसेच प्रक्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळं चांदीच्या भांड्यावर साचलेला काळपट पणा दूर होतो

6/7

बेकिंग सोडा

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

एका भांड्याला अॅल्युमिनियम फॉइल लावून घ्या. त्यानंतर त्यात उकळते पाणी टाकून बेकिंग सोडा टाका. 

7/7

भांडी नव्यासारखी चमकतील.

Easy Tricks and  To Clean Silver jewellery  Quickly at home

त्यानंतर या मिश्रणात चांदीची भांडी टाका व एका चमच्याने ढवळत राहा. काही वेळ ती भांडी तशीच ठेवून द्या. नंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. भांडी नव्यासारखी चमकतील.