महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'

Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं.   

Oct 30, 2023, 11:37 AM IST

Narayana Murthy : मागील काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या इन्फोसिसच्या सहसंस्थापकपदी असणाऱ्या नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. 

1/8

देशबांधणी

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

देशबांधणी आणि येणाऱ्या पिढीसाठी आठवड्यातून 70 तासांच्या कामाची संस्कृती देशात रुजू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि तरुण पिढीसह उद्योग क्षेत्रातील अनेकांचेच डोळे विस्फारले. 

2/8

संमिश्र प्रतिक्रिया

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

तिथं एकिकडून सज्जन जिंदाल आणि तत्सम काही मंडळींनी मूर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. तर, काही मंडळींनी मात्र त्यांच्या या वक्तव्याला स्पष्ट नकार दिला.   

3/8

घातक जीवनशैलीकडे सर्वांचं लक्ष

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

70 तासांचं काम एका आठवड्यात, असा उल्लेख होताच प्रत्येकजण आपला दृष्टीकोन मांडताना दिसता. काही डॉक्टरांनी तर, सध्याच्या तरुणाईच्या घातक जीवनशैलीकडे सर्वांचं लक्ष वेधलं.   

4/8

नाव न घेता टीका

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

आता एडलवाईस कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी अर्थात सीईओपदी असणाऱ्या राधिका गुप्ता यांनीही X च्या माध्यमातून मूर्ती यांच्या वक्तव्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली.   

5/8

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता...

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

'देशबांधणीसाठी घर आणि नोकरी यांमध्ये समतोल राखताना भारतीय महिला 70 हून अधिक तासांसाठी काम करत त्यांचं योगदान देतात. एक नवी पिढी घडवतात. कैक वर्षांपासून, दशकांपासून हे असंच सुरु आहे. तेसुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता', असं त्यांनी लिहिलं.   

6/8

उपरोधिक टोला

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

गंमत म्हणजे आमच्याविषयी कोणीही, कोणताही वाद घालताना- मतं मांडताना दिसत नाहीये, असा उपरोधिक टोला लगावत राधिका यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला.   

7/8

नारायण मूर्ती यांच्यावर निशाणा

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

राधिका गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांनी अतिशय हुशारीनं नारायण मूर्ती यांना निशाण्यावर घेतल्याचं अनेकांच्याच लक्षात आलं.   

8/8

तुमचं याविषयी काय मत?

edelweiss ceo radhika gupta targets narayana murthy 70 hrs work in a week statment

या एका ट्विटच्या निमित्तानं फक्त आठवड्यातील 70 तासांसाठीच्या कामासोबतच मग, महिला वर्गाची धावपळ आणि दैनंदिन कामांमध्ये त्यांचा वाटा हे मुद्देही अधोरेखित होऊन श्रम, त्याला मिळणारं मूल्य या सर्वच गोष्टींबद्दलचे विविध दृष्टीकोन मांडण्यात आले. तुमचं याविषयी काय मत?   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x