रक्तातील पांढऱ्या पेशी खूप महत्त्वाच्या; कमी होण्याची आणि वाढण्याची लक्षणे काय?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून बिघडली. रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढलं आहे. आज ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदे दाखल झाले. रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी -जास्त होणं शरीरासाठी किती घातक? कोणते आजार उद्भवू शकतात.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून खालावताना दिसत आहे. आज ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. ताप असून शिंदेंच्या घशाच्या इन्फेक्शन झाल्याच सांगण्यात येत आहे. तसेच तापामुळे त्यांना अशक्तपणा आल्याचही सांगण्यात येत आहे. या दरम्यान डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली असून ती निगेटीव्ह आल्याच सांगण्यात येत आहे. रक्तात पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढल्यामुळे होणारा त्रास आणि त्यामुळे होणारे जीवघेणे आजारही लक्षात घेणे गजरेचे आहे.