Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...

Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय...

Mar 16, 2023, 16:25 PM IST
1/12

Elephant Whisperers Oscar

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीने अकदामी पुरस्कार सोहळ्यात म्हणजेच ऑस्कर्स सोहळ्यामध्ये 'डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट' कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवला आहे.

2/12

Elephant Whisperers Oscar

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने मिळवलेल्या या पुरस्काराचा भारतभरामध्ये जल्लोष साजरा केला जात असतानाच तामिळनाडू सरकारने ज्या विषयावर ही डॉक्युमेंट्री आधारित आहे त्या हत्तींच्या महुतांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.  

3/12

Elephant Whisperers Oscar

ही डॉक्युमेंट्री ज्या हत्तीवर चित्रित करण्यात आली आहे त्याचं नावं रघु असून ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर या छोट्या रघु हत्तीला पाहण्यासाठी आता थेप्पाकडू एलिफन्ट कॅम्पमध्ये पर्यटक गर्दी करत आहेत. तसेच या डॉक्युमेंट्रीच्या केंद्रस्थानी असलेल्या बेल्ली आणि बोमन या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

4/12

Elephant Whisperers Oscar

ही डॉक्युमेंट्री दोन छोटे हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांमधील नातेसंबंधांच्या विषयावर आधारित आहे. 'सिख्या एंटरटेनमेंट'च्या मोंगा आणि अचिन जैन या डॉक्युमेंट्रीचे निर्माते आहेत.

5/12

Elephant Whisperers Oscar

तमिळ भाषेत बनवण्यात आलेल्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीने 'हॉलआऊट', 'हाउ डू यू मेजरमेंट अ ईयर?', ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ आणि ‘स्ट्रेंजर एट द गेट’  या डॉक्युमेंट्रीला मात देत पुरस्कार पटकावला.

6/12

Elephant Whisperers Oscar

या डॉक्युमेंट्रीच्या केंद्रस्थानी असलेल्या बेल्ली यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवताना, "मला ऑस्कर्सबद्दल ठाऊक नाही. मात्र मला तरुण हत्तीची 'वलारप्पु थाई' (पालक माता) म्हणून मिळालेली ओळख फार प्रिय आहे," असं म्हटलं. "हत्ती आमच्या लहान मुलांसारखे आहेत. आम्ही आई नसलेल्या छोट्या अनाथ हत्तींचं संगोपन हे एक सेवा म्हणून पाहतो," असं बेल्ली यांनी सांगितलं.

7/12

Elephant Whisperers Oscar

आपल्याला पुरस्कारासंदर्भात ठाऊक नसलं तरी हा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या शुभेच्छा मिळत आहेत त्यामुळे फार आनंद होतोय, असंही बेल्ली यांनी सांगितलं.

8/12

Elephant Whisperers Oscar

"मी अशा अनेक लहान हत्तींची माझ्या मुलांप्रमाणे काळजी घेतली आहे. मी आईप्रमाणे त्यांची काळजी घेतली आहे. खास करुन ज्या हत्तींच्या मातेचा जंगलात मृत्यू होतो त्यांना मी फार प्रेमाने मोठं केलं आहे," असं बेल्ली सांगतात.

9/12

Elephant Whisperers Oscar

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला ऑस्कर्स मिळाल्यानंतर तामिळनाडू सरकारने हत्तींची काळजी घेणाऱ्या सर्वच्या सर्व 91 महुतांना घर आणि प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याची निर्णय घेतला आहे.  

10/12

Elephant Whisperers Oscar

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये बेल्ली आणि बोमन यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भातील छोटा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करण्यात आला आहे.

11/12

Elephant Whisperers Oscar

तामिळनाडूमधील वन विभागाच्या अतिरिक्त सचिव सुप्रिया साहू यांनीही ट्विटरवरुन या महुतांबरोबरचा फोटो शेअर करत राज्य सरकारने या सर्व महुतांना घरं आणि प्रत्येकी 1 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्याचं म्हटलं आहे.

12/12

Elephant Whisperers Oscar

सुप्रिया साहू यांनी बेल्ली आणि बोमन यांच्याबरोबर काढलेला फोटोही शेअर केला आहे. बेल्ली आणि बोमन हे प्रकाश झोतात असले तर प्रत्येक महुत ज्या प्रेमाने आणि आपुलकीने हत्तींची काळजी घेतो त्याचं कौतुक केलं पाहिजे असं साहू यांनी म्हटलं आहे.