Emergency Alert चा मेसेज सकाळी तुमच्याही मोबाईलवर आला? नेमकं काय घडलंय जाणून घ्या

अनेकांच्या मोबाईलमध्ये आज सकाळी एमर्जन्सी अलर्टचे नोटिफिकेशन आले आहे. एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलमध्ये हा मेसेज आला. त्यामुळे हा कोणत्या नव्या फ्रॉडचा प्रकार आहे का अशी चर्चा सुरु झाली. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना हा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान या मेसेजमागचे सत्य समोर आले आहे.

| Jul 20, 2023, 13:36 PM IST

Emergency Alert Notification: अनेकांच्या मोबाईलमध्ये आज सकाळी एमर्जन्सी अलर्टचे नोटिफिकेशन आले आहे. एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलमध्ये हा मेसेज आला. त्यामुळे हा कोणत्या नव्या फ्रॉडचा प्रकार आहे का अशी चर्चा सुरु झाली. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना हा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान या मेसेजमागचे सत्य समोर आले आहे.

1/7

Emergency Alert चा मेसेज सकाळी तुमच्याही मोबाईलवर आला? नेमकं काय घडलंय जाणून घ्या

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

Emergency Alert Notification: अनेकांच्या मोबाईलमध्ये आज सकाळी एमर्जन्सी अलर्टचे नोटिफिकेशन आले आहे. एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलमध्ये हा मेसेज आला. त्यामुळे हा कोणत्या नव्या फ्रॉडचा प्रकार आहे का अशी चर्चा सुरु झाली. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना हा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान या मेसेजमागचे सत्य समोर आले आहे. 

2/7

मोबाईलवर पॉपअप मेसेज

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

दिनांक 20 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अनेकांच्या मोबाईलवर पॉपअप मेसेज आले. यामध्ये हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन संदेश असल्याचे सांगण्यात आले. 

3/7

पूर्वकल्पना नाही

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

या नोटिफिकेशन संदर्भात भारत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या अलर्ट बाबत भीती निर्माण झाली.

4/7

अधिकृत माहिती नाही

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीने याबाबत अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही तसेच ऑफिशियल ट्विटर हँडलवरही याबाबत काही सांगण्यात आले नाही. 

5/7

पॉपअप मेसेज

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

आधी हा मेसेज इंग्रजी भाषेमध्ये तर नंतर मराठी भाषेमध्ये देण्यात आला. पॉपअप मेसेज आल्यानंतर काही नागरिकांना हा मेसेज व्हाईस स्वरुपात देखील देण्यात आला. काहींनी नेहमीच्या सवयीप्रमाणे या मेसेजकडे दुर्लक्ष केले.

6/7

आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का?

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

आपत्कालीन मेसेजमध्ये क्लिक केल्यास तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का याबाबत विचारण्यात आले. त्यासाठी हो किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते.  ॲपल आयफोन युजर्सना हा मेसेज आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

7/7

दूरसंचार विभागाकडून मेसेज

Emergency Alert notofication on mobile Ministry of Information Broadcasting

हा मेसेज धोक्याचा नसून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आपत्कालीन अलर्ट सेवेची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.