रामायणाचं नक्षीकाम आणि 100 तास, आलिया भट्टच्या 'त्या' साडीची किंमत माहितीये?

Alia Bhatt Mysore Silk Saree : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर अयोध्येत हजर होते. या सोहळ्याला आलिया भट्टने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीच्या पदरावर रामायणाचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. कारागीराने हातांनी हे नक्षीकाम केलं आहे. सोशल मीडियावर आलिया भट्टच्या या साडीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

| Jan 23, 2024, 18:50 PM IST
1/7

अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाटी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर उपस्थित  होते. या सोहळ्यात आलिया भट्टच्या साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर देखील या साडीची चांगलीच चर्चा आहे. आलियाने सोनेरी रंगाची किनार असलेली निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. 

2/7

पहिल्या नजरेती आलियाने परिधान केलेली ही साडी सामान्य वाटते. पण या साडीच्या पदरावर असलेल्या नक्षीकामाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जी साडी परिधान केली होती. त्या साडीवर रामायणाचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. 

3/7

पदरावरच्या नक्षीकामासाठी कारागिरींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. दोन कारागिरांनी तब्बल 100 तास मेहनत घेत हाताने पदरावरचं हे नक्षीकाम केलं आहे. रामाणातील काही महत्चाचे प्रसंग साडीवर कोरण्यात आले आहेत. 

4/7

आलिया भट्टने परिधान केलेली ही साडी मैसूर सिल्क प्रकारातील आहे. या सीडीची किंमत जवळपास 45 हजार रुपये इतकी आहे. 

5/7

ही साडी  madhurya_creation डिझाईन केली आहे. हा ब्रँड भारतातील पुरातन वास्तूंचं साडीवर हाताने डिझाईन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

6/7

आलिया भट्ने परिधान केलेल्या या साडीवर शिव धनुष्य, राजा दशरथ, सुवर्णमृग, हनुमान माता सीतेला अंगठी देण्याचा प्रसंग, सीता अपहरण सारखे प्रसंग कोरण्यात आले आहेत. हे नक्षीकाम पट्टचित्र शैलीत बनवण्यात आलेत.

7/7

आलिया भट्टने या साडीबरोबर Dusala India ची शालही परिधान केली होती. याची किंमतही हजारात आहे.