Entertainment : 90 च्या दशकातील गाजलेल्या 'या' 6 मालिका, प्रेक्षकांच्या आजही आठवणीत
Entertainment : आज भारतात विविध भाषेतील अनेक चॅनेल्स (Channels) असून शेकडो मालिका छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीवर (TV) येत असतात. मनोरंजन (Entertainment), ऐतिहासिक (Historical), गुन्हे (Crime) असो की विनोदी अनेक पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. आपल्या देशात टीव्ही मालिका (TV Serials) बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. सध्याच्या काळात दिवसभर कोणती ना कोणती मालिका टीव्हीवर सुरु असते. भारतात 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली.पण टीव्ही मालिकांची सुरुवात 80-90 च्या दशकात झाली. त्यावेळी बहुतांश मालिका कौटुंबिक किंवा धार्मिक विषयांवर आधारित होत्या.