EPFO Interest Rate: PF वरील व्याजदर घटणार? नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी

EPFO Interest Rate: PF Balance वेळोवेळी पाहता की नाही? आताच पाहा त्यासंदर्भातील मोठी बातमी... 

Mar 06, 2023, 10:05 AM IST

EPFO Interest Rate: नोकरदार व्यक्तीच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जितकं महत्त्वं त्या व्यक्तीच्या पगाराला असतं, तितकं किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वं हे पीएफ खात्याला दिलं जातं. 

 

1/6

EPFO Interest Rate

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

याच PF संदर्भात एक मोठा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाऊ शकतो. ज्या धर्तीवर सध्या पीएफवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

2/6

EPFO Interest Rate news

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

EPFO कडून 2021 - 22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला होता. त्याआधी 2020-21 मध्ये 8.5 टक्के दरानं व्याज मिळत होतं.   

3/6

EPFO Interest Rate calculations

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

मार्च महिन्याच्या अखेरीस EPFO च्या बैठकीत आगामी व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाणार असून, हे दर 8 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात. 

4/6

EPFO Interest Rate in marathi

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

आगामी निवडणुका लक्षात घेता ही घट मोठी नाही, किंबहुना तसा निर्णयही घेतला जाणार नाही असं जाणकारांचं मत. पण, काही अंशांनीसुद्धा तो घटणं म्हणजे खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गावर आलेलं संकटच. 

5/6

Interest Rate

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

व्याजदराबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचच लक्ष आहे. पण त्याआधी तुम्हीसुद्धा या व्याजदराबाबतची माहिती करून घ्या. PF Balance तपासण्यासाठी जात असाल, तर सर्वप्रथम EPFO च्या संकेतस्थळाला भेट द्या. इथं Our Services मेन्यूमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या डॉपडाऊन पर्यायातून for employees पर्याय निवडा.   

6/6

EPFO

EPFO Interest Rate latest news process to check PF Balance

आता Member passbook वर क्लिक करा. UAN क्रमांक आणि पासवर्डनं लॉगईन करा. PF खातं निवडून तुम्हाला लगेचच Balance दिसेल. UMANG App वरून तुम्ही सोप्या पद्धतीनं ही रक्कम पाहू शकता.