आज यशस्वी असले तरीही अनेकदा Reject झालेत हे कलाकार; Madhuri Dixit ही यादीत...

या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कालाकारांनी Film Audition मध्ये रिजेक्शन पचवलं, Madhuri Dixit ही यादीत...

Dec 26, 2022, 11:11 AM IST

Bollywood Celebrities : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार आपलं नशीब चमकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकांयची असतात. अशा वेळेस एखाद्या चित्रपटात चांगली भूमिका साकारायला मिळावी असं अनेकांचे स्वप्न असते. आज आम्ही तुम्हाला काही अशा सुप्रसिद्ध कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांना ऑडिशनमध्ये निवड न झाल्यामुळे अपयशाचा सामना करावा लागला. माधुरी दीक्षितपासून (Madhuri Dixit) ते आलिया भट्टपर्यंत (Alia Bhatt) अनेक बॉलिवूड कलाकारांचा या यादीत समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊ हे कलाकार आहेत तरी कोण?

1/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचे ठोको वाढवले. पण तुम्हाला माहितेय का तिला ही रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. दूरदर्शनच्या टीव्ही सीरियल 'बॉम्बे मेरी है' च्या पहिल्या भागात एक भूमिका साकारली होती, परंतु जेव्हा मालिकेच्या निर्मात्यांना तिचा अभिनय विशेष वाटला नाही तेव्हा त्यांनी माधुरीला नाकारले.

2/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारी एकमेव अभिनेत्री आलिया भट्ट. तिनं बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन स्वत:ची ओळख निर्माण केली. आलिया भट्टने 'वेक अप सिड' चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते पण तिला नकाराचा सामना करावा लागला. 

3/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

विकी कौशल (Vicky Kaushal) विकी कौशलनं त्याच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये कमी वेळातच चांगली जागा मिळवली. त्यांच्या आतापर्य़ंतच्या साकारलेल्या भूमिकांसाठी त्याचे कौतूक केले जाते. विकीने 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते पण त्याला देखील नकाराचा सामना करावा लागला होता.

4/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

रणवीर सिंग (Ranveer Singh) रणवीर सिंगला त्याच्या अतरंगी स्टाईलसाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. पण त्याचा अभिनयामुळे तो घरोघरी पोहचला. पण 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटासाठी ऑडिशन देताना त्यालाही नकाराचा सामना करावा लागला होता.

5/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

अक्षय कुमार (Akshay Kumar) अक्षय कुमारला एका वर्षात 4 ते 5 चित्रपट करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. अभिनेता अक्षय कुमारने 'शेखर' आणि 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. पण त्याला तिथे नकाराचा सामना करावा लागला. 

6/6

Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies

वरुण धवन (Varun Dhawan) 'स्टुडंट ऑफ द इयर', 'बदलापूर', 'एबीसीडी' वरुण धवनचे हे चित्रपट सुपरहिट आहेत. त्याने देखील कमी वेळातच इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला 'धोबी घाट' आणि 'लाइफ ऑफ पाय' यासाठी त्याने ऑडिशन दिले होते पण त्या चित्रपटांसाठी नकार देण्यात आला होता.