Farmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Rain and Farmers Damage : अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566211-farm1.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566209-farm6.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566208-farm4.jpg)
राज्यात 13 हजार 729 हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. तूर्तास हाती आलेल्या माहितीनुसार शेतक-यांना तात्काळ मदत केली जाणार आहे. येवला तालुक्यातील नगरसुल आणि सायगावमध्ये गारांचा पाऊस पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, कांदा पिकांना मोठा फटका बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून येवल्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस बरसतोय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566207-farm3.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566206-farm2.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566200-farm5.jpg)
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि खरबूज या रसाळ फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांना या अवकाळीचा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या फळ गारांच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे झाले आहेत. उभ्या फळ पिकावर रोटा मारण्या शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566198-farm7.jpg)